शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जिल्हा परिषदेत सीईओंकडून झाडाझडती; १२९ दांडीबहाद्दरांना दिली कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:57 IST

Aurangabad Zilla Parishad : अनेकवेळा कर्मचारी हजेरी लावून निघून जातात, अशा स्वरुपाच्या तक्रारी पदाधिकारी व सदस्यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधाच्या कामात मुख्य कार्यकारी अधिकारी व्यस्त असल्याने कर्मचारी निर्ढावले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अचानक आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी बुधवारी चांगलाच झटका दिला. सकाळी सव्वा दहा ते अकरा वाजेदरम्यान सर्वच विभागात भेट देत त्यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. हजेरी रजिस्टर जमा करुन घेतले. यात १२९ लेटलतिफ गैरहजर असल्याचे आढळून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या बैठकांसाठीही कर्मचारी वेळेवर येत नाहीत. अनेकवेळा कर्मचारी हजेरी लावून निघून जातात, अशा स्वरुपाच्या तक्रारी पदाधिकारी व सदस्यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. स्थायी समितीच्या सभेतही उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी यासंबंधी कारवाईची मागणी केली होती. कोरोना प्रतिबंधाच्या कामात मुख्य कार्यकारी अधिकारी व्यस्त असल्याने कर्मचारी निर्ढावले होते. बुधवारी डॉ. गोंदावले कार्यालयात पोहचताच त्यांनी सिंचन विभागाचा रस्ता धरला. तिथे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची विचारपूस करत सोबतच्या शिपायाला हजेरी रजिस्टर ताब्यात घ्यायला सांगून त्यांनी बांधकाम, समाजकल्याण, आरोग्य, पंचायत, पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, पाणीपुरवठा, यांत्रिकी, महिला व बालकल्याण, वित्त व सामान्य प्रशासन विभागाला भेटी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अचानक आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अर्ध्या तासाच्या या भेटीत नेमके चालले काय कुणाला कळले नाही. उशिरा येणाऱ्या आणि दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल अशी माहिती मिळताच इमानेइतबारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र, डॉ. गोंदावले यांच्या कारवाईचे स्वागत केले.

विभागप्रमुखांना भरला दम११ वाजता डॉ. गोंदावले यांनी विभागप्रमुखांची बैठक बोलावली. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुन्हा असा प्रकार घडू नये. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर रहावे, ही विभागप्रमुखांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत त्यांनी स्वीय सहायकांना नियमित हजेरी रजिस्टर मागवून पडताळणी करण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या पाहणीत बहुतांश विभागप्रमुखही गैरहजर आढळून आले. त्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तरीही गुरुवारी ६१ लेटलतिफसीईओ डाॅ. गोंदावले यांनी दिलेल्या सूचनेनुसार सीईओंच्या स्वीय सहायकांनी हजेरी रजिस्टर मागवून साडेदहा वाजता पडताळणी केली. त्यात ६१ जण गैरहजर असल्याचे दिसून आले. त्या ६१ जणांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूृचना सीईओ कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद