शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

पाली विभागातील नियमबाह्य नेमणुकांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:00 IST

तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्याप्रकरणी पाली विभागाची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी राजभवनाकडे तक्रार केली आहे. तीन उमेदवारांची स्थानिक समितीने सदोष पद्धतीने निवड केल्याचा आक्षेप होता.

ठळक मुद्देविद्यापीठ : राज्यपालांकडे तक्रार; न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा

औरंगाबाद : तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्याप्रकरणी पाली विभागाची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी राजभवनाकडे तक्रार केली आहे. तीन उमेदवारांची स्थानिक समितीने सदोष पद्धतीने निवड केल्याचा आक्षेप होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली आणि बुद्धिझम विभागातील तासिका तत्त्वावरील नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. तासिका तत्त्वावरील दोन जागांसाठी ३० एप्रिल २०१६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निवड ११ महिन्यांसाठी करण्यात आली होती. तसेच दरमहा २४ हजार रुपये निश्चित मानधन होते. मुलाखतीसाठी पाच सदस्यांची समिती होती. मात्र, निवड प्रक्रियेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम पाळले गेले नाही, असा आक्षेप उमेदवार सुचिता इंगळे यांनी घेतला होता. विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे इंगळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने संबंधित उमेदवारांना पदावरून काढण्याचे आदेश दिले होते. पण, विद्यापीठ प्रशासनाने पदमुक्त करीत अनुभव प्रमाणपत्र दिले. थेट गुणांकन करण्याची चूक निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत विभागनिहाय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे. याचिकाकर्त्याच्या बाजूने अ‍ॅड. शिरीष कांबळे यांनी बाजू मांडली.दरम्यान, पाली आणि बुद्धिझम विभागाची चौकशी करण्याबाबत राजभवनकडे तक्रार करण्यात आली आहे. निवड समितीवर गुन्हे दाखल करण्याची तक्रारकर्त्यांची मागणी आहे. अपात्र उमेदवारांची नियुक्ती वादात सापडल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे.निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रारराजभवनाच्या संकेतस्थळावर भाजपशी निगडित पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे आणि मजूकर होता. वेबसाईटर लॉग इन केल्यानंतर हा मजकूर वाचनात येत होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपण भाजपशी संबंधित असल्याचे या माध्यमातून खुलेपणाने दाखविले. हा आचारसंहितेचा भंग असून, कारवाई करावी अशी मागणी मराठवाडा विकास कृती समितीने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. या पत्रावर अ‍ॅड. शिरीष कांबळे, हनुमंत गुट्टे आणि प्रा. दिगंबर गंगावणे यांची स्वाक्षरी आहे.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणuniversityविद्यापीठ