बीड : तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत एका शिक्षिकेवर समायोजनात अन्याय झाला आहे. तेथेच कार्यरत दोन शिक्षिकांनी संघटनांच्या पदाधिकारी असल्याचे पत्र आणून जागा काबिज केल्या आहेत. त्यामुळे संघटनांच्या नावाखाली समायोजनात सुरु असलेला सावळागोंधळ पुढे आला आहे.सुरेखा नागोराव काकडे या पाली येथील माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून ३१ डिसेंबर २०१३ पासून कार्यरत आहेत. या शाळेत एकूण पाच पदे मंजूर आहेत; पण प्रत्यक्षात सात जणांची नियुक्ती आहे. जून २०१४ मध्ये दर्जावाढ झाली. यामध्ये सहशिक्षिका शकुंतला धस व अर्चना माथेसूळ या अतिरिक्त ठरल्या. मात्र, त्या दोघीही संघटनांच्या पदाधिकारी असल्याने समायोजनात सूट दिली जात असल्याचे आदेश सीईओ राजीव जवळेकर यांनी काढले. त्यामुळे सुरेखा काकडे अतिरिक्त ठरल्या आहेत. आदेशाची पडताळणी करासीईओ जवळेकर यांच्या एका आदेशावरील पत्रात जावक क्रमांक नाही. ५ आॅगस्ट व १३ आॅगस्ट अशा दोन तारखा आहेत. शिवाय दोन्ही आदेशांमध्ये संघटनांचे नाव नमूद नाही. त्यामुळे आदेशाची पडताळणी करा, अशी मागणी सुरेखा काकडे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.पाली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. शेटे म्हणाले, धस व माथेसूळ यांच्या आदेशांबाबत मला संभ्रम आहे. ४त्यामुळे मी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन खातरजमा करण्यास सांगितले आहे. मात्र, सीईओंनीच आदेश काढल्याने मला त्यांना रुजू करुन घ्यावे लागले.४आता मी आणखी एक पत्र पाठविणार असून शिक्षण विभागाला मार्गदर्शन मागविणार आहे.जिल्ह्यात शिक्षकांच्या जवळपास १२ संघटना अधिकृत आहेत. संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना समायोजनात सवलत देण्याचा नियम आहे. मात्र, खिरापतींप्रमाणे पदे वाटली जात असल्याने संघटनांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
समायोजनामध्ये शिक्षिकेवर अन्याय
By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST