: अपघातात रस्त्याच्या बाजूला बेशुद्धावस्थेत पडलेल्या जखमी तरुणाला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे स्वीय सहाय्यक नामदेव खराद, शेखर शिंदे व जगन्नाथ मिटकर यांनी अपघातात जखमी झालेल्या तरूणास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. पैठण शहागड रोडवरील
वडवाळी फाटा येथे काल जामखेड येथून पैठणकडे जाताना गणेश चव्हाण या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जखमी अवस्थेत गणेश चव्हाण रस्त्याच्या बाजूला पडलेलेले होते. दरम्यान रस्त्याने जात असताना नामदेव खराद, शेखर शिंदे व जगन्नाथ मिटकर यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी ताबडतोब विलास बापू भुमरे प्रतिष्ठानची रुग्णवाहिका बोलावून जखमी चव्हाण यांना घाटी रुग्णालयात पोहोचविले. सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचे खराद यांनी सांगितले.