शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पारधी सामाजातील मुलांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:29 IST

इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेल्या पारधी वसाहतींकडे आजही गुन्हेगारांची वसाहत म्हणून पाहिले जाते. पोलीस या वसाहतींवर केवळ धाड मारण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी जातात, असा अनुभव आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मात्र या वसाहतींना सुधारणेचे दरवाजे खुले करून तेथे पालात राहणाऱ्या मुलांना त्यांनी शाळेत घातले. त्या मुलांना शालेय साहित्य प्रदान करून शिक्षणच तुम्हाला तारू शकते, हे पटवून दिले. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर त्यांचा विश्वास बसावा, याकरिता त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न समजावून घेतले.

बापू सोळुंकेऔरंगाबाद : इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेल्या पारधी वसाहतींकडे आजही गुन्हेगारांची वसाहत म्हणून पाहिले जाते. पोलीस या वसाहतींवर केवळ धाड मारण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी जातात, असा अनुभव आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मात्र या वसाहतींना सुधारणेचे दरवाजे खुले करून तेथे पालात राहणाऱ्या मुलांना त्यांनी शाळेत घातले. त्या मुलांना शालेय साहित्य प्रदान करून शिक्षणच तुम्हाला तारू शकते, हे पटवून दिले. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर त्यांचा विश्वास बसावा, याकरिता त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न समजावून घेतले.औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी पारधी वसाहती आहेत. इंग्रज देश सोडून गेले. मात्र, पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला नाही. आजही कोठे दरोडा पडला, मोठ्या चोºया अथवा एखादा मोठा गुन्हा घडल्यास पोलिसांकडून पारधी वसाहतींवर धाडी टाकल्या जातात. पारधी वसाहतीमधील संशयितांची धरपकड करून त्यांना जेलमध्ये डांबले जाते. यामुळे पारधी वसाहतींकडे पोलीस आल्यास तेथील पुरुषांसह लहान, मोठे तरुण मुले लपून बसतात, नाही तर पळून जातात. गुन्हा केला नसला, तरी संशयित म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांचा पीसीआर काढला जातो. परिणामी, पोलीस आणि पारधी समाज यांच्यात कायम छत्तीसचा आकडा राहिला आहे. गुन्हा केला नसतानाही पोलीस पकडतात, म्हणून या समाजातील तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचेही दिसतात.पारधी समाजातील मोजक्या लोकांकडे अल्प शेती आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने या समाजातील पुरुष मंडळी एक तर मजुरी करतात नाही तर चोºया, दरोडे टाकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षणापासून कोसोदूर असलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. परिणामी, आजही कोणत्याही पारधी वसाहतीमध्ये सर्व वयोगटातील लहान मुले उनाडक्या करताना दिसतात. नाही तर शहरात सिग्नलवर भीक मागताना आढळतात. शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात बदल होऊ शकतो, याबाबत ठाम विश्वास असलेल्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी नुकताच पारधी समाजाचा एक मेळावा घेतला. एवढेच नव्हे तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया पारधी वसाहतीमधील १५ मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस