शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

अमानुष! श्वान टपावर बसू नये म्हणून कार कव्हरला चक्क खिळे, प्राणीप्रेमींमधून संताप

By संतोष हिरेमठ | Updated: June 14, 2024 13:24 IST

खिळे असलेल्या कव्हरची ऑनलाइन विक्री अन् वापरही जोरात; मोकाट कुत्री जखमी होण्याचा धोका

छत्रपती संभाजीनगर : रात्री रस्त्यावर उभ्या चारचाकीच्या टपावर श्वान चढून बसतात. श्वानाला काही तरी टोचते अन् क्षणात कारवरून ते उडी मारते. मोकाट श्वानांना चारचाकीपासून दूर ठेवण्यासाठी चक्क खिळे असलेले कव्हर वापरले जात आहे. या कव्हरची ऑनलाइन विक्री जोरात सुरू आहेच. मात्र, वाहनचालकांकडून त्याचा वापरही होत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर रात्री चारचाकी उभ्या असतात. या चारचाकीच्या टपावर मोकाट कुत्रे चढतात. यातून अनेकदा चारचाकीचे छत दाबते, स्क्रॅचेसही पडतात. चारचाकीची काचही फुटण्याचा धोकाही असतो. शिवाय अस्वच्छतेचाही प्रश्न असतो. या सगळ्यावर उपाय म्हणून खिळेयुक्त कव्हर बाजारात आले आहे. चारचाकीच्या छतावर आणि समोरील बाजूवर हे कव्हर टाकता येते. मात्र, यातून श्वान जखमी होऊ शकते.

वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी हा उपाय नाहीवाहनाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. मात्र, अशा प्रकारचे कव्हर वापरणे, हा त्यावर पर्याय नसल्याचे प्राणीप्रेमी संघटनांनी म्हटले. टोकदार खिळे कव्हर टाकल्यानंतर मोकाट श्वान अशा चारचाकीपासून दूर राहतात; परंतु अशा कव्हर असलेल्या चारचाकीवर पहिल्यांदा जाणारे श्वान जखमी होण्याचा धोका आहे.

कव्हरविरुद्ध प्राणीप्रेमींनी एकत्र यावेचारचाकीपेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा आहे, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. चारचाकीवर स्क्रॅचेस पडतात, म्हणून अशा टोकदार खिळे असणाऱ्या कव्हरला प्रमोट करता कामा नये. चारचाकीवर साधे कव्हरही वापरता येतील. प्राण्यांना इजा पोहोचवणाऱ्या अशा कव्हरविरुद्ध प्राणीप्रेमींनी एकत्र आले पाहिजे. घरे बांधल्या गेल्याने श्वानांचा निवारा हिरावला गेला आहे. नागरिकांनी स्वत: घरापुढे अथवा काॅलनीत त्यांच्यासाठी छोटेसे शेल्टर करावे.- अमृता दौलताबादकर, सचिव, पीपल फाॅर ॲनिमल

असे कव्हर वापरणे चुकीचेचारचाकीसाठी टोकदार खिळे असलेले कव्हर वापरणे चुकीचे आहे. श्वानांना त्यापासून इजा होऊ शकते. नागरिकांनी असे कव्हर वापरणे टाळावे. शिवाय अशा कव्हरवर बंदी आली पाहिजे.- प्रवीण ओहळ, सचिव, होप अँड ॲनिमल ट्रस्ट

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdogकुत्रा