शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कुख्यात बोक्या स्थानबद्ध

By admin | Updated: November 16, 2014 00:02 IST

औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारी कारवाया करणारा कुख्यात गुंड बोक्या ऊर्फ मोहंमद अनिस (रा. क्रांतीचौक) यास पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी आज हर्सूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले

औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारी कारवाया करणारा कुख्यात गुंड बोक्या ऊर्फ मोहंमद अनिस (रा. क्रांतीचौक) यास पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी आज हर्सूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृक- श्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम १९८१ चे कलम (१) अर्थात (एमपीडीए अ‍ॅक्ट १९८१) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.मोहंमद अनिस ऊर्फ बोक्या याच्या विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चोरी करणे, जबरी चोरी, अवैैध शस्त्र बाळगणे, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी दखलपात्र ६ गुन्हे दाखल आहेत. तो आपल्या दहशतीच्या जोरावर क्रांतीचौक परिसर, भोईवाडा, समर्थनगर येथील रहिवाशांकडून खंडणी वसूल करीत असे, मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशांना लुटमार करीत होता. त्याच्या या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी त्यास २०१२ मध्ये औरंगाबाद शहरातून तडीपार केले होते. तडीपार असतानाही तो शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करीतच होता. उलट त्याच्या गुन्ह्यांचा आलेख चढतच असल्याने ही कारवाई करण्यात आली.