शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संगणक, लॅपटॉपचा वापर वाढला; मान, कंबर, मणकेदुखीने अनेक जण त्रस्त, काय काळजी घ्याल?

By संतोष येलकर | Updated: January 17, 2024 11:20 IST

मोबाइलचाही अतिवापर : मान, कंबर, मणकेदुखीने अनेक जण त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : हल्ली लॅपटाॅप, संगणक आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. संगणकावर काम करताना आठ-आठ तास एकाच जागेवर बसून राहावे लागते. अशातूनच मान, कंबर, मणकेदुखीच्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ओढावत आहे. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर हा त्रास दूर ठेवता येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

अस्थिरोगतज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये लॅपटाॅप, संगणकावर अनेक तास काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. संगणकाशिवाय अनेक कामे अशक्य झाली आहेत. त्यामुळे संगणकाचा वापर वाढला आहे. कार्यालयासह वर्क फ्राॅम होममध्येही संगणकावरच काम केले जाते. त्याच्या अतिवापरामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

संगणक, लॅपटॉप अतिवापराचे धोके काय?पाठदुखी, मणकेदुखी : संगणक, लॅपटाॅपच्या अतिवापरामुळे पाठदुखी, मणकेदुखी उद्भवण्याचा धोका वाढतो.

मानदुखी : एकाच जागेवर सतत बसून संगणकावर काम केल्याने मानदुखीला सर्वाधिक सामोरे जावे लागते.गुडघेदुखी : संगणकावर सलग काम केल्याने गुडघेदुखीचाही त्रास उद्भवतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

काय काळजी घ्याल?तासाभरानंतर थोडा ब्रेक घ्या : संगणकावर सलग काम करताना किमान तासाभरानंतर थोड्या वेळेसाठी ब्रेक घेतला पाहिजे.

स्ट्रेचिंग करा : तासाभरानंतर ब्रेक घेतल्यानंतर स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.मानेचा नियमित व्यायाम करा : घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत म्हणाले की, संगणकावर काम करताना मान कमी वाकवली पाहिजे. तसेच नियमितपणे मानेचा व्यायाम करावा.

योग्य पद्धतीने बसावेलॅपटाॅप, संगणकाचा अतिवापर आणि या गोष्टी वापरताना चुकीच्या पद्धतीने बसल्याने कंबरेचे आणि मानेचे दुखणे वाढते. असा त्रास घेऊन अनेक रुग्ण येतात. त्यामुळे संगणकावर काम करताना काही वेळेनंतर ब्रेक घेतला पाहिजे. स्ट्रेचिंग केले पाहिजे. त्यातून कंबरेला, मणक्याला आराम मिळतो. योग्य पद्धतीने बसून काम करावे.- डॉ. चंद्रशेखर गायके, अस्थिरोगतज्ज्ञ व एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealth Tipsहेल्थ टिप्स