शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

हमीभाव व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे गहू, उडीद व हरभरा डाळीच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:53 IST

केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ व दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती या दोन्हीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देचालू खरीप हंगामात पिकणाऱ्या शेतीमालासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर त्यानुसार मूग ६९७५ रुपये, उडीद डाळ ५६०० रुपये व तूर डाळीचा हमीभाव ५६७५ रुपये प्रतिक्विंटल भाव परिणामी, बाजारपेठेत डाळीचे भाव वधारले.

औरंगाबाद : केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ व दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती या दोन्हीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्यास सुरुवात झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, उडीद डाळ व हरभरा डाळीच्या भावात वाढ झाली आहे.

चालू खरीप हंगामात पिकणाऱ्या शेतीमालासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव (एमएसपी) देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय मागील महिन्यात केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार मूग ६९७५ रुपये, उडीद डाळ ५६०० रुपये व तूर डाळीचा हमीभाव ५६७५ रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. परिणामी, बाजारपेठेत डाळीचे भाव वधारले. केंद्र सरकारकडे तूर व हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र, मराठवाड्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भाववाढीत आणखी भर पडली आहे. आता हळूहळू जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू लागले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत २०० रुपयांनी महागून हरभरा डाळ ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. मराठवाड्यात तूर, मूग व उडदाचा पेरा चांगला झाला आहे. मात्र, पावसाने ताण दिल्याने सध्या पिकाबदल शाश्वती देता येत नाही. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. यामुळे २०० ते ३०० रुपयांनी वधारून तूर डाळ ५४०० ते ६००० रुपये, मूग डाळ ६००० ते ७००० रुपये, उडीद डाळ ४६०० ते ५६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. आता हमीभाव वाढल्याने शेतकरी खरिपातील मूग, तूर, उडीद कमी भावात विक्री करणार नाही. त्यात दुष्काळाच्या परिस्थितीने स्थानिकमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते; पण परराज्यात चांगला पाऊस झाला आहे. तेथील उत्पादनावर येथील डाळीच्या किमतीचे भविष्य ठरेल, अशी माहिती डाळीचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी दिली. येथील दुष्काळसदृश परिस्थिती आणखी १० दिवस अशीच राहिली व सरकारने गोदामातील तूर व हरभरा बाहेर आणला नाही, तर सणासुदीत भाववाढ होऊ शकते. गव्हापाठोपाठ ज्वारी, बाजारीत वाढ गव्हाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, मध्यप्रदेश सरकारने बोनससह हमीभाव १९५० रुपये प्रतिक्विंटल देऊन शेतकऱ्यांकडून गहू खरेदी केला. परिणामी, २०० ते ३०० रुपयांनी गव्हाचे भाव वधारून सध्या २४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. त्यापाठोपाठ भाववाढ होऊन ज्वारी २२०० ते २६०० रुपये, तर बाजरीचा भाव १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

 

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकार