शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट काढण्यासाठी ओघ वाढला; अर्ज केलाय तर दीड महिना थांबा...

By साहेबराव हिवराळे | Updated: April 21, 2023 15:33 IST

दिवसाला फक्त ८० जणांच्याच होतात मुलाखती; अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढली

छत्रपती संभाजीनगर :पासपोर्ट नोंदणीनंतर दररोज ऑनलाइन मुलाखतीसाठी ८० अर्जदारांच्याच मुलाखती होत आहेत. विलंब झाला की, पुन्हा पुढच्या तारखेची ऑनलाइन तारीख तुमच्या मोबाइलवर कळविली जाते. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. टपाल कार्यालयात पासपोर्ट सुविधा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, त्यास पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला; परंतु सेवासुविधांत भर पडलेली नाही.

वर्षभरात १३ हजारांवर नागरिकांना पासपोर्ट देण्यात आला आहे. शहरात व्यापार तसेच पर्यटनाच्या वाढत्या सफरीमुळे पासपोर्ट अपडेट करणे किंवा नवीन काढण्यात पालकांसह विद्यार्थीही अग्रेसर आहेत. अनेकांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी येत असल्याने ऑनलाइन अर्ज करून पासपोर्ट काढण्याच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.

स्वत:च भरा अर्ज आणि मिळवा पासपोर्ट‘तात्काळ’साठी वेगळे शुल्क भरावे लागत असून, अर्ज करताना संगणकाच्या स्क्रीनवर कागदपत्रांची यादी येते, त्याची पूर्तता केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही. संगणकावर अर्ज केल्यावर पासपोर्टची ऑनलाइन मुलाखतीची दिनांक व वेळ मोबाइलवर कळवली जाते. त्या ठरलेल्या दिवशीच व वेळेवर दाखल केलेल्या कागदपत्रासह कार्यालयात दाखल होणे गरजेचे आहे. मुलाखत झाल्यावर पोलिसांकडून पडताळणीदेखील होते आणि त्यानंतर आठ ते पंधरा दिवसांत पासपोर्ट घरपोच येतो; परंतु अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढलेली आहे.

विलंब कमी करण्यासाठी प्रयत्न सुरुपासपोर्ट लवकर मिळण्यासाठी इतरही जिल्ह्यांतील नागरिक ऑनलाइन अर्ज करून येथे सेवाकेंद्राचे नामनिर्देश करतात. त्यामुळे ‘वेटिंग’ वाढलेले आहे. अन्यथा छत्रपती संभाजीनगरवासीयांना आठ ते पंधरा दिवसांतच पासपोर्ट पाठविला जातो. पोस्टाचेही कर्मचारी मदतीला आहेत. विलंब कसा कमी होईल, याचा वरिष्ठांशी बोलून निर्णय घेता येईल.- अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट