शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

आॅनलाइनच्या व्यसनामुळे मनोविकारात वाढ, वेळीच काळजी घेणे आवश्यक, युवा पिढी नेट चॅटिंग, सोशल मिडिया, विविध गेमच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:47 IST

तरुणांमध्ये सतत आॅनलाइन राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना याचे व्यसनच जडत असल्याचे दिसून येत आहे. मनोविकारतज्ज्ञांकडे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालकांनी धाव घेणे सुरूकेले आहे.

- डॉ. खुशालचंद बाहेती औरंगाबाद : तरुणांमध्ये सतत आॅनलाइन राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना याचे व्यसनच जडत असल्याचे दिसून येत आहे. मनोविकारतज्ज्ञांकडे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालकांनी धाव घेणे सुरूकेले आहे.मानसोपचारतज्ज्ञांच्या मते आॅनलाइनचे व्यसन हा नवीन मानसिक विकार अनेक तरुणांमध्ये दिसून येत आहे. पालकांमध्ये मात्र याकडे पाहिजे तितक्या प्रमाणात गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचे दिसत नाही. पालक लहान मुलांना गप्प बसविण्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल देऊन आपली सोय करून घेतात; मात्र मुले यामुळे अधिकाधिक त्याच्या आहारी जात आहेत. नेट चॅटिंग, सोशल मीडिया, स्वस्त आणि सहज उपलब्ध गेम, पॉर्न साइटस्च्या आकर्षणामुळे हे प्रमाण वाढतच आहे. मोफत वायफाय किंवा अत्यल्प दरात नेट पॅक यामुळेही यात वाढ होत आहे.व्यसनाधीन होणा-यांमध्ये १८ ते २० वयोगटातील मुलांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा मुलांमध्ये चिडचिड करणे, एकलकोंडे राहणे, खाण्या-पिण्याकडे लक्ष न देणे अशा तक्रारी सुरुवातीस दिसतात.व्यसनाच्या पुढच्या टप्प्यात कपड्यांमध्ये मलमूत्र करणे सुरू होते. मुलांना निद्रानाश होतो व हे व्यसन आणखी वाढायला लागते. अशी मुले दिवसभर मोबाइलला चिकटलेली असतात.जगभरात ६ टक्के लोकांना या व्यसनाची लागण झाली असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनात आढळून आले आहे. अन्य एका संशोधनात देशातील शहरी भागांत या व्यसनाचे प्रमाण २४ टक्क्यांपर्यंत असल्याचे आढळून आले आहे.मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजीव सावजी यांच्या मते, हे प्रमाण वाढत आहे; मात्र मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याकडे पालकांचा कल कमीच आहे. सध्या आठवड्यामध्ये २ किंवा ३ पालक अशा मुलांना घेऊन येतात; मात्र यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात मुलांमध्ये हे व्यसन जडले आहे. पालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. वेळीच लक्ष न दिल्यास सिझोफ्रे निया सारखे विकार निर्माण होऊ शकतात. 

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्य