लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील रेशन दुकानदारांना धान्य वितरणासाठी कमीशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे़राज्यातील गोरगरीब नागरिकांना स्वस्तदरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण प्रणाली राबविली जाते़ या प्रणालीतील मान्यता प्राप्त परवानाधारक दुकानदारांना धान्य वितरित केल्यानंतर कमीशन दिले जाते़ शिधा वाटप/रास्तभाव दुकानदारांना धान्य वितरणासाठी यापूर्वी ७० रुपये प्रतिक्विंटल या दराने कमीशन दिले जात होते़ वाढलेले व्यवसाय कर, दुकानातील कर्मचाºयांना अनुज्ञेय असलेली कमीत कमी मजुरी, सक्षम प्राधिकाºयाकडून आकारण्यात येणारे अनुज्ञेय शुल्क, परवाना नूतनीकरणाचे शुल्क, विद्युत देयक, नोंदणी शुल्क, साठवणूक परवाना शुल्क आदी बाबींवर होणाºया खर्चात वाढ झाल्याने रेशन दुकानदारांच्या कमीशनमध्येही वाढ करण्याची मागणी रेशन दुकानदारांनी केली होती़ या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ तसेच राज्य शासनाने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्याचे वितरण ई-पॉस मशीनच्या सहाय्याने करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचीही दखल घेत कमीशनमध्ये वाढ करण्यात आली आहे़देण्यात येणाºया वाढीव कमिशनचा खर्च जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वैयक्तिक ठेव लेख्यातून किंवा त्यांना मंजूर करण्यात येणाºया अनुदानातून मंजूर करावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़ महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा शासन आदेश निर्गमित केला आहे़
स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:40 IST