शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सहा मतदारसंघात ३३ हजार नवीन मतदारांत वाढ

By admin | Updated: September 13, 2014 23:39 IST

लातूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात जुलै अखेरपर्यंत १७ लाख १३ हजार ९२३ मतदारांची नोंदणी झाली असून,

लातूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात जुलै अखेरपर्यंत १७ लाख १३ हजार ९२३ मतदारांची नोंदणी झाली असून, गत लोकसभा निवडणुकीतील मतदारांच्या तुलनेत आता ३२ हजार ८२८ मतदारांची संख्या वाढल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग पोले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली़ मतदान यादीत नाव नसलेल्यांना रविवारीही आपली नावे नोंदविता येतील, असेही सांगितले़ आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करून जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, जिल्ह्यातील मतदारसंघात एकूण १९१८ बूथ आहेत़ यात लातूर शहर मतदारसंघात ३०८, लातूर ग्रामीणमध्ये ३३७, अहमदपूर ३४१, उदगीर २९७, निलंगा ३३२, औसा ३०३ अशी बूथ संख्या आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक मतदार लातूर शहर मतदारसंघात असून, ३ लाख २६ हजार ७१० अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ लातूर ग्रामीण मतदारसंघात २ लाख ९२ हजार ५२४ मतदार आहेत़ अहमदपुरात २ लाख ८६ हजार ८२, उदगीर २ लाख ६९ हजार ६२८, निलंगा २ लाख ८२ हजार ७८०, औसा २ लाख ५६ हजार १९७ मतदार आहेत़ लातूर ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूकनिर्णय अधिकारी हे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव असून, उर्वरित मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी आहेत़ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार काम पाहणार आहेत़ लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर तहसीलमधील गातेगाव, मुरुड, कासारखेडा, तांदूळजा या मंडळांचा तसेच रेणापूर तालुका आणि औसा तालुक्यातील भादा मंडळाचा समावेश आहे़ लातूर शहर मतदारसंघात शहर व लातूर महसूल मंडळातील गावे आहेत़ अहमदपूर मतदारसंघात अहमदपूर व चाकूर तालुका त्याचबरोबर उदगीर मतदारसंघात उदगीर व जळकोट तालुका आहे़ निलंगा मतदारसंघात निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्याचा समावेश आहे़ तसेच औसा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील कासारशिरसी, कासारबालकुंदा व मदनसुरी मंडळ आणि औसा तालुक्यातील भादा मंडळ वगळून संपूर्ण औसा तालुक्याचा समावेश आहे़ यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पी़बीख़पले, अपर जिल्हाधिकारी पाटोदकर यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी़ आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात मतदारांना आता दूरध्वनीवरही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ तक्रारीनंतर पथकामार्फत योग्य ती दखल घेतली जाईल़ तसेच जिल्हास्तरावरही यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे़ मतदानासाठी छायाचित्र असलेला पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे़ त्यामुळे मतदारांजवळ आवश्यक तो पुरावा असणे गरजेचे आहे़ खर्चाची २० पासून नोंद़़़४विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची खर्चाची नोंद निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याच्या दिवसीपासून घेतली जाईल़ मतदारसंघाव्यतिरिक्त अन्य मतदारसंघात एखाद्या उमेदवाराने खर्च केल्यास त्याची माहिती निवडणूक विभागास सादर करणे आवश्यक राहणार नाही़ तसेच चार-पाच सोशल नेटवर्किंग साईटवर जाहिरात केल्यास उमेदवाराला त्यासंदर्भातील खर्च सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले़विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जनजागृतीपर रॅली, महाविद्यालयीन युवकांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ गत लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघाची मतदानाची टक्केवारीही ७़५ टक्क्यांनी वाढली आहे़ यात आणखीन १० ते १५ टक्के वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़