औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात मनपा हद्दीत अवघ्या ३ आणि ग्रामीण भागात ११ अशा १४ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार घेऊन २७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, गेल्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील ३ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्येत घसरण कायम असून, सध्या १८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ५५३ झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४४ हजार ८०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३ हजार ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ९ आणि ग्रामीण भागातील १८ अशा २७ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरु असताना पालखेडा येथील ८० वर्षीय पुरुष, पैठण येथील ५२ वर्षीय पुरुष आणि बागडी, गंगापूर येथील ६० वर्षीय पुरुष आणि असेगाव, शेवगाव (जि. अहमदनगर) येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
बजाजनगर १, माऊलीनगर १, अन्य १
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर २, वैजापूर ४, पैठण ३, फुलंब्री १.