शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तपासात मनपाचे असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:22 IST

महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़परभणी महानगरपालिकेने वीज वितरण कंपनीकडून पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या घेतल्या आहेत़ पथदिव्यांच्या बिलाचा भरणा प्रत्येक महिन्याला महावितरणकडे आरटीजीएस पद्धतीने केला जातो़ मात्र या प्रकारात महापालिकेच्या पैशातून खाजगी व्यक्तींचे वीज बिल भरले जात असल्याची बाब उघड झाली़ २७ सप्टेंबर रोजी हा प्रकार निदर्शनास आला़ त्यानंतर महावितरण कंपनीने कोतवाली पोलीस ठाण्यात मनपाचे सहाय्यक अ़ जावेद अ़ शकूर आणि महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला़ प्रारंभीच्या माहितीनुसार ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक झाली असून, हे सर्व पैसे महापालिकेचे असल्याने मनपाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असताना मनपाचेच तपासाला असहकार्य होत असल्याचे समोर येत आहे़जून २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत महापालिकेने वीज बिलापोटी ८ कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपये महावितरणने दिले़ त्यापैकी ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांच्या रकमेतून ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली होती़ याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय अधिकारी संभाजी मालकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येवून जवळपास एक महिन्याचा कालवधी होत आहे़ या संपूर्ण काळात पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ तसेच या प्रकरणामध्ये संबंधितांची चौकशीही झाली नाही़ महानगरपालिका पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़ मध्यंतरी दिवाळीचा कालावधी असल्याने प्रकरण थंड बस्त्स्यात पडले होते़ परंतु, त्यानंतरही तपासात प्रगती नसल्याचे दिसत आहे़ महापालिकेच्या मालकीच्या पैशांचा गैरव्यवहार झाला असल्याने मनपातील अधिकाºयांनी स्वत:हून पुढे येऊन तपासाला गती देणे आवश्यक आहे़ परंतु, मनपातील अधिकारी या प्रकरणाविषयी बोलायलाही तयार नाहीत़ त्यामुळे तपासाला गती मिळत नाही़या प्रकरणात महानगरपालिकेने चौकशी समिती स्थापन केली़ परंतु, चौकशी समितीनेही अद्याप आपला स्पष्ट अहवाल दिलेला नाही़ त्यामुळे एक महिन्यापासून या गैरव्यवहार प्रकरणातील तपासाला गती मिळत नसल्याचेच दिसत आहे़