शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमध्ये ६ ज्वेलर्सवर आयकरचे सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 18:17 IST

ऐन दिवाळीत सिल्लोड येथील ६ सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानात आज सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरु केला आहे.

औरंगाबाद :  ऐन दिवाळीत सिल्लोड येथील ६ सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानात आज सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरु केला आहे. यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

करचुकवेगिरी करणाऱ्या व्यवसायिकांवर आयकर विभागाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत.  त्यातही सराफा ज्वेलर्स प्रथमस्थानी आहेत. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील ६ सराफा दुकानावर एकाच वेळी अधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरु केला. यासाठी १५ ते २० अधिकारी, कर्मचारी सिल्लोडमध्ये दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी आपल्या कार दुकानापासून लांब उभ्या केल्या आणि नंतर दुकानांमध्ये प्रवेश केला. सर्व्हे सुरु होताच ६ सराफा दुकानाचे शटर खाली ओढण्यात आले होते. आतमध्ये अधिकारी सोने-चांदी, दागिणे, आवक-जावक याचा हिशोब तपासत होते. 

एकूण किती कोटीची करचुकवेगिरी झाली हे सायंकाळपर्यंत समजले नाही. अधिकारी विविध बँक खात्याचे पासबुक, बील बुक, खरेदीबुक तपासणी करीत होते. या आयकर विभागाच्या सर्व्हेची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्याभरात पोहोचली. पुन्हा एकदा ग्रामीण भागातील व्यावसायिकांवर लक्षकेंद्रीत केले असल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली होती. एवढेचे नव्हे तर शहरातील सराफा व्यावसायिकही परिस्थितीवर नजर ठेवून होते. अनेक व्यापारी एकामेकाच्या संपर्कात होते. 

दोन वर्षापूर्वी झाला होता सर्व्हे दोन वर्षापूर्वी आयकर विभागाचे प्रधान आयुक्त श्रीदयाल श्रीवास्तव असताना त्यांनी सर्वप्रथम करचुकवेगिरी करणाऱ्या  ग्रामीण भागातील काही  व्यावसायिकांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानुसार सिल्लोड, पैठण येथील व्यावसायिकांचा सर्व्हे केला होता. त्यावेळीसही सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानाचा सर्व्हे करण्यात आला होता. तेव्हा सर्व्हेतून काही निष्पन्न झाले की नाही.  किती कोटीचे करचुकवेगिरी झाली याची माहिती अजूनपर्यंत कळाली नाही.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सAurangabadऔरंगाबादTaxकर