शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:16 IST

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना जबर धक्का, आयकर खात्याकडून नोटीस मिळाल्याची दिली कबुली

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटातील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याची माहिती त्यांनीच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विट्स हॉटेल लिलाव प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता आयकर विभागाची नोटीस मिळाल्याने हा मंत्री शिरसाट आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस मिळाल्याची स्पष्ट कबुली दिली. "ब्लॅकचे पैसे आता चालणार नाहीत. हे विधान माझ्यासाठीच आहे." अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी यावेळी केली. तसेच २०१९ आणि २०२४ दरम्यान त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ यावरच आयकर विभागाची चौकशी केंद्रित असल्याचे त्यांनी सूचित केले.

विट्स हॉटेल खरेदीवरून संशयसंजय शिरसाट यांचा मुलगा विट्स हॉटेलचा लिलाव ६७ कोटींना जिंकला, तरी प्रत्यक्ष बाजारभाव ११० कोटी रुपये होता, असा आरोप विरोधकांनी केला होता. नंतर शिरसाट यांनी लिलावातून माघार घेतल्याची घोषणा केली. परंतु, हा विषय विधानसभेतही चर्चेचा विषय ठरला आणि या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

वित्तीय पारदर्शकतेचा मुद्दा?एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विट्स प्रकरणी तक्रार केल्यानंतरच आयकर खात्याचे लक्ष शिरसाट यांच्याकडे वळल्याचे बोलले जात आहे. आता त्यांच्याकडील संपत्ती, आर्थिक व्यवहार आणि करदायित्व यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. मंत्री शिरसाट यांनी नोटीस मिळाल्याची कबुली दिल्यानंतर माजी खासदार जलील यांनी या प्रकरणात सत्य समोर आले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नोटीस आली उत्तरासाठी वेळ मागितलाएखाद्या मंत्र्याला आयकर विभागाकडून थेट नोटीस मिळणे ही दुर्मीळ बाब मानली जात असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नोटीस मिळाली असून उत्तर देण्यासाठी वेळ मागितला असल्याचे मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटIncome Taxइन्कम टॅक्सchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर