शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाची मर्यादा ६ लाख

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

अर्धापूर : शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घेतला. ६ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

अर्धापूर : शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घेतला. ६ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. शासकीय, निमशासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थामध्ये या प्रवर्गास आरक्षणाचा लाभ घेता येईल. हे आरक्षण उन्नत व प्रगत घटकांना लागू होणार नाही. या प्रवर्गाला इतर मागासवर्गीयांप्रमाणेच राजकीय आरक्षण वगळता सर्व सोयी प्राप्त होणार आहेत. हे आरक्षण ९ अधिसूचित विभागांना व पदांना लागू होणार नाही.शासकीय व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शालेय शिक्षण उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य शिक्षण, कृषी शिक्षण या विभागाअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी १६ टक्के आरक्षण लागू राहील. मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा तहसीलदारांचा दाखला, जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून मिळणारे जातवैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र अनिवार्य राहील. हे प्रमाणपत्र कसे मिळवावे याबाबतची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही कागदपत्रे विशेष कार्यकारी अधिकारी, राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेली असावी. दहावी व बारावीचे गुणपत्रक, बोर्ड सर्टीफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, शिधापत्रिकेचे पहिले व शेवटचे पान, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, गावातील वर्ष व त्यापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांचा रहिवासी दाखला किंवा मागील वर्षाचे वास्तव्य सिद्ध करणारी वीजबिले, उतारे, मालमत्ता कर पावत्या आदी कागदपत्रे अनिवार्य राहील. गाव कामगार तलाठी यांच्याकडून कुटुंबप्रमुख, शिधापत्रिका प्रमुखाच्या नावे मागील एक आणि तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र किंवा वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. (वार्ताहर)परराज्यातील व्यक्तींनाही अटीअर्जदार हे परराज्यातील असतील तर त्यांच्यासाठीही काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वीस वर्षांपासूनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा मालमत्तेचे कार्ड, जमीन असेल तर खरेदी खत, कर पावत्या सादर कराव्या लागणार आहेत. विवाहित स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास विवाहानंतरचे पुरावे म्हणून पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचे पुरावे, विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात प्रसिद्ध झालेला नावातील बदल किंवा लग्नपत्रिका किंवा पोलिस पाटील यांचा दाखला, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना लागणार आहे.