शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..!’ आरोग्यासाठी खिसा होतोय रिकामा

By संतोष हिरेमठ | Updated: April 11, 2024 14:30 IST

६५ टक्के शहरवासीयांचे १० टक्के उत्पन्न आरोग्यावर खर्च, विमा काढण्यावर भर

 

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा होतो. यावर्षी या दिनाची ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ ही संकल्पना आहे. या दिनानिमित्त ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ६५ टक्के शहरवासीयांना आपल्या उत्पन्नापैकी सुमारे १० टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करावी लागत आहे. तर काहींचा हाच खर्च २५ टक्क्यांवर आहे. याच वेळी ५३ टक्के नागरिकांनी खासगी रुग्णालयांचे शुल्क खूप अधिक वाटत असल्याचे नमूद केले आहे.

सर्वेक्षणात कोणत्या वयोगटातील नागरिकांचा सहभाग?-१८ ते ३५ वर्षे : २६.९ टक्के नागरिक-३६ ते ५८ वर्षे : ६५.४ टक्के नागरिक-५९ ते त्यापुढे : ७.७ टक्के नागरिक

१) उत्पन्नातील किती टक्के रक्कम तुमच्या आरोग्यावर खर्च होते?- १० टक्के : ६५.४ टक्के नागरिक- २५ टक्के : २३.१ टक्के नागरिक- ५० टक्के : ११.५ टक्के नागरिक- ७५ टक्के : ० टक्के नागरिक

२)उपचार घेण्यास कोणत्या रुग्णालयाला प्राधान्यक्रम देता?- घाटी रुग्णालय : ११.५ टक्के नागरिक- जिल्हा रुग्णालय : ८ टक्के नागरिक- मनपा आरोग्य रुग्णालय : १०.५ टक्के नागरिक- खासगी रुग्णालय : ७० टक्के नागरिक

३) तुम्ही आजारी पडल्यावरच रुग्णालयात जाता की, नियमित आरोग्य तपासणी करता?- आजारी पडल्यावरच : ७३.१ टक्के नागरिकनियमित आरोग्य तपासणी करतो :२६.९ टक्के नागरिक

४) खासगी रुग्णालयात आकारण्यात येणारे शुल्क कसे वाटते?- अधिक : ३८.५ टक्के नागरिक- खूप अधिक : ५३.८ टक्के नागरिक- किफायतशीर : ७.७ टक्के नागरिक

५) तुम्ही आरोग्य विमा काढला आहे का?- होय : ४६.२ टक्के नागरिक- नाही : ५३.८ टक्के नागरिक

शहरातील आरोग्य सुविधा..- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)- जिल्हा सामान्य रुग्णालय- शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था)- शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय- राज्य कामगार विमा योजना रुग्णालये- छावणी रुग्णालय- महापालिकेची रुग्णालये-५- मनपा आरोग्य केंद्र-३५- शहरात खासगी रुग्णालये- ५५०

‘आयएमए’कडून फ्री ओपीडी सेवा‘आयएमए’कडून ‘स्पेशालिस्ट फ्री ओपीडी’ सेवा दिली जाते. गेल्या २० वर्षात महागाई वाढली. कर वाढले. रुग्णालयांचे विविध खर्चही वाढले. त्यामुळे शुल्कही वाढले. सरकार, डाॅक्टर आणि संघटनेने एकत्र येऊन यावर विचार केला पाहिजे.- डाॅ. विकास देशमुख, सचिव, आयएमए

नियमित व्यायाम महत्त्वाचाजॉगिंग आणि धावणे हे व्यायाम सर्वांत सोपे आणि कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना उपयुक्त असतात. मधुमेह, निरोगी हृदय, वजन कमी करणे, हाडांची ताकद वाढविणे, श्वसन संस्था सुधारणे, मानसिक विश्रांती, चरबी कमी होणे आदींवर फायदा होतो.- डॉ. प्रफुल्ल जटाळे, आयर्नमॅन

सर्वेक्षणात नागरिकांनी मांडलेली मते...- केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार यांनी आरोग्य सेवा मोफत अथवा किफायतशीर दरात उपलब्ध करून द्यावी.- शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांत सरकारी आरोग्य योजना लागू करण्यात करण्यात याव्या.- खासगी रुग्णालयातील शुल्कांवर नियंत्रण आणावे.- सरकारी रुग्णालयांत योग्य उपचार देऊन स्वच्छतेबाबत काळजी घेणे गरेजेचे.- ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला आणखी बळकटी मिळावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यdoctorडॉक्टर