शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शालिवाहनकालीन तीर्थखांबाचा युनेस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळात समावेश करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 20:00 IST

पैठण नगरपालिकेने घेतला ठराव;विविध पैलूने घडवलेला तीर्थखांब (विजयस्तंभ) अडीच हजार वर्षांपासून आपलं अस्तित्व टिकवून आहे.

पैठण (जि. औरंगाबाद) : शहरातील ऐतिहासिक तीर्थखांबाचा युनेस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने शिफारस करावी, असा प्रशासकीय ठराव सोमवारी पैठण नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.

पैठण हे सम्राट शालिवाहनाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. विक्रमादित्य राजाचा पराभव करून मिळवलेल्या अद्भूत विजयाबद्दल विजयाचे प्रतीक म्हणून पैठण येथे पालथी नगरीत सम्राट शालिवाहन राजाने उभारलेला विजय स्तंभ आज ‘तीर्थखांब’ म्हणून ओळखला जातो. पैठणच्या ऐतिहासिक गतवैभवाची व शिल्पकलेच्या अजोड सौंदर्याची साक्ष देत तीर्थखांब ही दगडी कलाकृती आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. अशा प्रकाराचा दगडी स्तंभ देशात पैठण व रांची (झारखंड) या दोनच ठिकाणी आहे. खांबाची दगडी कलाकृती जोड देऊन एकत्रित केलेली आहे. दगडी जोडस्तंभावर स्वर्ग, मृत्यू व पाताळ या कल्पना चित्रांकित केलेल्या आहेत. तळाशी मातृका मंडळ व भैरवाचे शिल्प कोरलेले असून भैरवाच्या गळ्यात मुंडमाळा व त्यातून ठिबकणारे रक्त चाटणारे श्वान अतिशय हुबेहूब कोरलेले आहे. खांबाच्या मधल्या भागात शृंगार शिल्पे कोरली आहेत. मध्य भागातील मकर मुखाच अष्टकोनी गोल वर्तुळ विशेष देखणं आहे.

जागतिक ओळख मिळावी, यासाठी खटाटोपविविध पैलूने घडवलेला तीर्थखांब (विजयस्तंभ) अडीच हजार वर्षांपासून आपलं अस्तित्व टिकवून आहे. अशा या देखण्या वास्तूला जागतिक प्रसिद्धी मिळावी व देश-विदेशातील पर्यटकांंची पावले पैठणकडे वळावीत, या अनुषंगाने पैठण शहरातील तीर्थखांबाचा जागतिक पर्यटनस्थळाच्या यादीत (युनेस्को) समावेश करावा, यासाठी केंद्र व राज्य शासनास प्रशासकीय ठराव मंजूर करून पाठविण्यात आल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन