शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने कर्ज काढून २४ लाख दिले अन् गुंतवणूकदाराने फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 19:39 IST

जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यानची घटना असून एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

औरंगाबाद : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून हिंदुस्थान पेट्रोलियम कार्यालयातील कर्मचारी गोरखनाथ शिंदे (रा. रेश्मीनगर, हर्सूल) यांना एकाने तब्बल २४ लाख रुपयांना गंडविले. ही घटना जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

ज्ञानदेव सखाराम नारळे (४८, रा. नारेगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, जानेवारी २०२१मध्ये शिंदे यांचे मित्र संतोष घोडके यांनी ज्ञानदेवची ओळख करुन दिली. नारळेने डीएसएन ट्रेड वर्ल्ड या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असून, माझ्या बँक खात्यावर पैसे द्या, मी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे सांगितले. शिंदे यांनी १६ जानेवारी २०२१ रोजी वैयक्तिक कर्ज घेऊन नारळेच्या खात्यात १२ लाख रुपये भरले. त्यानंतर वैयक्तिक बचतीतील दीड लाख रुपयेही दिले. यानंतरही नारळेने ८ महिन्यांत पैसे परत करण्याच्या बोलीवर अधिक पैसे देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शिंदेंनी खासगी पतसंस्थेचे कर्ज घेऊन २ लाख रुपये नारळेस दिले. त्यानंतर काही दिवसांनी नारळे याने आणखी पैशांची मागणी केल्यानंतर शिंदे यांनी मित्राकडून हातउसने घेऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नारळेच्या कार्यालयात नेऊन १० लाख ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर ३० मे रोजी २ लाख रुपये रोख दिले, असे एकूण २८ लाख रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

चार लाखांची परतफेडनारळेकडे पैशांची वारंवार मागणी केल्यानंतर त्याने केवळ ४ लाख रुपये दिले. त्याच्याकडे मुद्दल २४ लाख रुपये बाकी आहेत. सतत पैशांची मागणी केल्यानंतर त्याने शिंदेंच्या नावाने १० व पत्नीच्या नावे १५ लाखांचे धनादेश दिले. तसा नोटरी करारनामासुद्धा केला आहे. यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर शिंदेंनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्याठिकाणी चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक सहाय्यक निरीक्षक शिवाजी चौरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद