शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाड्या केंद्रस्थानी, दोन्ही बोर्ड परीक्षा राहाणार, पण...

By विजय सरवदे | Updated: March 11, 2023 18:46 IST

नवीन शैक्षणिक धोरणात सध्याच्या १० +२ ऎवजी ५ +३+ ३+ ४ असा नवा शैक्षणिक आकृतिबंध लागू होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक धोरणात दहावी, बारावी बोर्ड परीक्षा असतील. मात्र, १२ वी बोर्ड परीक्षेलाच अधिक महत्त्व राहील. मुळात शिक्षणातून गुणांसाठी सुरू असलेली रस्सीखेच थांबली पाहिजे. मुलांची नैसर्गिक कुवत, आवड व कौशल्य लक्षात घेऊन त्यांना शिक्षण द्यावे, ही बाब शिक्षकांनी लक्षात ठेवावी, असे मत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणांसंबंधी एमजीएम परिसरातील आइनस्टाइन सभागृहात शुक्रवारी ‘शिक्षण कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. उज्ज्वल करवंदे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी रमेश ठाकूर होते. यावेळी नीलेश राऊत, राजेंद्र वाळके यांच्यासह सभागृहात मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

डॉ. करवंदे यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणात सध्याच्या १० +२ ऎवजी ५ +३+ ३+ ४ असा नवा शैक्षणिक आकृतिबंध लागू होणार आहे. कौशल्यावर अधारित शिक्षणास प्रोत्साहन आणि घोकंपट्टीवर अधारित शिक्षण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मूल्यांकन पद्धतीत बदल असणार आहे. यात मुलं काय शिकली तसेच मुलांचे अध्ययन घडावे म्हणून मूल्यमापन हा नवा विचार पुढे आला आहे. याशिवाय सध्या ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’ तसेच राज्य शिक्षण मंडळ या सर्व बोर्डामध्ये एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. वैश्विक स्तरावरील स्पर्धेत आपला विद्यार्थी उतरला पाहिजे, टिकला पाहिजे, चमकला पाहिजे, या दृष्टीने अभ्यासक्रम तयार केला जात आहे. हे धोरण २०४० पर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलात आणला जाणार आहे. ‘निपुण भारत’ हे आपले पहिले लक्ष्य आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश मोरे यांनी केले. आभार विनोद शिणकर यांनी मानले.

अंगणवाड्या शिक्षण केंद्र बनतीलनवीन शैक्षणिक धोरणात पूर्व शालेय शिक्षणावर भर देण्यात आला असून, पोषण आहारासाठी प्रसिद्ध असलेल्या अंगणवाड्या यापुढे शिक्षण केंद्र म्हणून पुढे येतील. मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुले वैश्विक स्तरावर कशी टीकतील, असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. मात्र, मातृभाषेतून सक्तीने नव्हे, तर शक्य असल्यास मातृभाषेतून शिक्षण द्यावे, शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती नव्हे, तर त्यांच्या कामगिरीवर देण्याचे या धोरणात नमूद केले आहे. याशिवाय शाळांना सरसकट अनुदान मिळणार नाही, तर शाळांच्या शैक्षणिक कामगिरीनुसार अनुदान दिले जाईल.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा