शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

देवाच्या घरी, देवाच्या दारी विसाव्याचा आनंद...वारकऱ्यांच्या भक्तीरसात पैठणनगरी चिंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 10:50 IST

देवाच्या दारी नाथनगरीतील वास्तव्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. फडाफडात भोजनाच्या पंगती उठत होत्या.

पैठण :शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला,नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा !नाथषष्ठीसाठी पैठण नगरीत आलेल्या हजारो वारकऱ्यांनी गुरुवारी परत एकदा नाथ समाधीचे दर्शन घेत मनोभावे आपली श्रद्धा नाथांना अर्पण केली. कळत नकळत हातून काही चुकले असल्यास क्षमा करावी म्हणून दोन्ही हाताने कान धरून संत एकनाथांसमोर मन मोकळे केले. दरम्यान, शहरभर विसावलेल्या वारकऱ्यांच्या राहूट्यातून भक्तीभावाच्या सुराने अवघी पैठण नगरी आज चिंब चिंब झाली.

महाराष्ट्रभरातून नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या शहरभर विविध भागात विसावल्या आहेत. आज तसा वारकऱ्यांचा विश्रांतीचा दिवस. देवाच्या घरी व देवाच्या दारी विसावा घेण्याचा दिवस असल्याने गुरुवारी वारकरी निवांत दिसून आले. मध्यरात्री निघणाऱ्या नाथांच्या छबीना पालखीत सहभागी होण्याची तयारी वारकरी करत असल्याचे दिसून आले.

नाथसंस्थानकडून सत्कारनाथषष्ठीसाठी आलेल्या दिंडीप्रमुख व पालखी प्रमुखांचा नाथसंस्थानच्यावतीने गुरुवारी सत्कार करण्यात आला. कार्यकारी विश्वस्त दादा बारे व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन दिंडीप्रमुखांचा सत्कार झाला. पुढील वर्षी पुन्हा नाथषष्ठीसाठी या, असे निमंत्रण त्यांना देण्यात आले. यावेळी नाथसंस्थान व प्रशासनाकडून चांगल्या सोयी सुविधा वारकऱ्यांना मिळाल्याचे दिंडीप्रमुखांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

आध्यात्मिक वस्तूंची खरेदीगुरुवारी वारकऱ्यांना निवांत वेळ उपलब्ध असल्याने यात्रा मैदानातील विविध दुकानातून वारकरी महिला व पुरुषांनी आध्यात्मिक वस्तूंची खरेदी केली. यात हार्मोनियम, पखवाज, मृदंग, टाळ, वीणा, खंजिरी, डफ आदी भजनाचे साहित्य तर गळ्यातील तुळशी माळ, कुंकू, बुक्का, अष्टगंध, प्रसाद विविध देवांच्या मूर्ती, समयी, निरंजणी, मंदिरातील घंटा, विविध धार्मिक ग्रंथ, पुस्तके अशा नानाविध वस्तूंची खरेदी वारकरी करीत असल्याचे चित्र आज यात्रा मैदानात दिसून आले.

यंदा खरेदी वाढलीनाथषष्ठी म्हणजे वारकऱ्यांच्या खरेदीचा वार्षिक मॉल असतो. जे जे हवे असेल ते ते या नाथषष्ठीसाठी आल्यानंतर खरेदी केले जाते. कोरोनाच्या महामारीने गेले दोन वर्ष यात्रा रद्द झाल्याने वारकऱ्यांची खरेदी झाली नसल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. गावागावात वर्गणी करून यात्रेतून टाळ, मृदंग, लाउडस्पीकर, वीणा आदी भजनाचे साहित्य वारकरी यात्रेतून खरेदी करत होते. गतवर्षीपेक्षा यंदा विक्री चांगली आहे, असे विक्रेते कृष्णा सांगलीकर यांनी सांगितले.

देवादारी वास्तव्याचा आनंददेवाच्या दारी नाथनगरीतील वास्तव्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. फडाफडात भोजनाच्या पंगती उठत होत्या. या पंगतीतून केला जाणारा आग्रह व भेट होताच एकमेकाचे जय हरी म्हणत केलेले चरण स्पर्श, कुठलाही बडेजाव नसलेल्या सर्वसामान्य वारकऱ्यांची देवा प्रती असलेली श्रद्धा व एकमेकांबद्दल असलेला आदर मनाचा ठाव घेणारा होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAdhyatmikआध्यात्मिक