शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत खवा, मिठाईमध्ये झालेली भेसळ होळीला कळणार

By साहेबराव हिवराळे | Updated: November 24, 2023 19:44 IST

छत्रपती संभाजीनगरातील प्रयोगशाळा काही तांत्रिक बाबींमुळे सुरू झालेली नाही.

छत्रपती संभाजीनगर : आपल्या जिल्ह्यातून अन्न व औषध प्रशासनाने जमा केलेल्या दीडशेेवर नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून प्रलंबित आहे. कारण पुणे येथून हे नमुने तपासून येण्यासाठी विलंब होत आहे. खवा, मिठाई व इतर खाद्यपदार्थांचे सर्वच नमुने घेतलेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा भार त्या प्रयोगशाळेवर आहे. छत्रपती संभाजीनगरातील प्रयोगशाळा काही तांत्रिक बाबींमुळे सुरू झालेली नाही. ती सुरू झाली तर विलंब टळेल. विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असून, कोर्ट तसेच इतर कामांत अधिकारी दिवसभर अडकून राहतात.

दिवाळीत १६२ नमुनेदिवाळीत मिठाई व इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी अन्न औषधी प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यात खाद्यपदार्थ तपासणी केली. १६२ नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. अजून किती दिवस लागतील, सांगता येत नाही.

नमुने कोणत्या प्रयोगशाळेला पाठविले जातात?छत्रपती संभाजीनगर तालुका तसेच जिल्हाभरात जमा करण्यात आलेल्या मिठाई व खाद्यपदार्थांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाने पाठविले आहेत.

अहवाल कधी येणार?आधीचे व आता दिवाळीला घेतलेले नमुने पाठविले. ते अहवाल आलेले नाहीत. ते होळीत येतील, असे सांगण्यात येत आहे.

मनुष्यबळाचा अभावकर्मचारी, अधिकारी संख्यादेखील कमी झाल्याने दररोजचे काम सांभाळत नमुने घेणे, ते प्रयोगशाळेला पाठविणे सोयीचे होत नाही. कर्मचारीसंख्या वाढविण्याची गरज आहे.

अधिकाऱ्यांचा अख्खा दिवस कोर्टकचेरीतगुणवत्ता तपासणी किंवा नेहमीचे नमुने घेणे यासाठीचे मनुष्यबळच घटलेले असून, एखादा खटला सुरू असला की, त्यासाठी अधिकाऱ्यांचा बराच वेळ कोर्टात जातो. त्यासाठी अधिकारी, निरीक्षक संख्या वाढविण्याची गरज आहे, त्यासाठी शासनाकडून नव्याने भरतीच झालेली नाही.- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागAurangabadऔरंगाबाद