शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोक्राला पोखरले; शेतकऱ्यांशी संगनमत करून अधिकाऱ्यांनी लाटले लाखोंचे अनुदान

By बापू सोळुंके | Updated: July 29, 2023 15:56 IST

पैठण तालुक्यात पोक्रातील मधुमक्षिका पालन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मधुमक्षिकापालन योजनेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे.

मधुमक्षिका पेट्या विकत न घेता, अनुदानाची रक्कम लाटण्यासाठी एका ठिकाणी काढलेल्या छायाचित्रातील अक्षांश, रेखांशमध्ये फेरफार करून वेगवेगळ्या शेतकऱ्यांची छायाचित्रे घेण्यात आली. ही छायाचित्रे अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील असल्याचे दाखविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतील निम्मा हिस्सा घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचे सूत्राने सांगितले. 

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन करण्यासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येते. पैठण तालुक्यातील खादगाव, रांजणगाव दांडगा आणि वडजी या गावातील शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन योजनेसाठी कृषी विभागाकडे अर्ज केला. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पेट्या विकत घेतल्याची कागदोपत्री दाखविले. एवढेच नव्हे तर एकाच गावातील शिवारात वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांची छायाचित्रे काढण्यात आली.

काय आहे पद्धत?या अर्जानुसार शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून मधुमक्षिका पालनासाठी पेट्या खरेदी करून आणणे. या पेट्या आणून त्यांच्या संबंधित गटातील शेतात ठेवाव्यात. नंतर कृषी विभागाचे कृषी सहायक, कृषी मंडळ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून तेथे शेतकऱ्यांसह मधुमक्षिका पेट्यांची छायाचित्रे अक्षांश, रेखांशासह घेऊन पोकरा योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असते. नंतर काम झाल्याच्या पूर्णत्वाचा दाखला कृषी सहायक, पर्यवेक्षक अथवा मंडळ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते.

असा केला घोटाळापैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंथेवाडी शिवारातील एका शेतात विविध गावांतील अर्जदार शेतकऱ्यांना उभे करून मधुमक्षिका पेट्यांसह छायाचित्रे काढली. छायाचित्रातील अक्षांश, रेखांशमध्ये फेरफार करून शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ही छायाचित्रे घेतल्याचे दाखवून सिस्टीममध्ये अपलोड केली. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे आवश्यक होते. पण तालुका कृषी अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली नाही. यातून घोटाळेबाजांचे फावले आणि त्यांनी रांजणगाव दांडगा येथील १७ शेतकऱ्यांना तर वडजी येथील १८ आणि खादगाव येथील ७ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम प्रत्येकी १ लाख ६२ हजार रुपये जमा केले.

तक्रार होताच आणल्या मधुमक्षिका पेट्याघोटाळ्याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव मुळे यांनी याविषयी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला. चौकशी होत असल्याचे लक्षात येताच, पैठण तालुक्यातील संबंधित कृषी सहायक, कृषी मंडळ अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी सारवासारव करीत शेतकऱ्यांना मधुमक्षिका पेट्या विकत घ्यायला लावल्या.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद