शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनरात आता सकाळीही लूट; ज्येष्ठ नागरिकास गळ्याला चाकू लावून दागिने हिसकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:42 IST

रामनगरमध्ये भर जालना रोडवर धक्कादायक प्रकार; मुकुंदवाडी पोलिसांचे डीबी पथक झोपेतच

छत्रपती संभाजीनगर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकास चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. त्यांच्या अंगावरील दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने ओढून घेत दुचाकीवरून पळ काढला. बुधवारी चक्क सकाळी ८:३० वाजता भर जालना रोडवर रामनगरमध्ये ही घटना घडली.

बाबूराव विठ्ठल लहाने (७४, रा. मुकुंदवाडी) हे सकाळी मित्र देसाई जाधव यांच्यासह नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी धूत रुग्णालयापासून विमानतळाकडे पायी गेले. तेथून दोघेही घराच्या दिशेने निघाले. जालना रोडवरून विठ्ठलनगरकडे वळत असतानाच चौकात त्यांना दोन दुचाकीवरील चौघांनी अडवले. एका दुचाकीवरील दोघांनी जाधव यांच्या खांद्यावर हात ठेवत धमकावून बाजूला नेले. दुसऱ्याने क्षणात लहाने यांच्या गळ्याला चाकू लावला. अंगावरील ८ ग्रॅमची अंगठी व गळ्यातील १२ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून काढत सुसाट पोबारा केला. दोघांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. लहाने यांच्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकी विनानंबर प्लेट होत्या. चौघेही लुटारू सडपातळ व अंदाजे तिशीतले होते. त्यांच्या हातात लांब व मोठ्या आकाराचे चाकू होते.

सुस्तावलेल्या पोलिसांमुळे आत्मविश्वास वाढलामुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमारीच्या घटनांनी विक्रम रचला आहे. पण, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील डीबी पथक झोपेतच आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठांकडूनदेखील याबाबत विचारणा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुस्तावलेल्या पोलिसांमुळेच आता सकाळीदेखील शस्त्रधारी टोळ्यांनी नागरिकांना लुटण्यास सुरुवात केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Senior Citizen Robbed at Knifepoint During Morning Walk in Sambhajinagar

Web Summary : In Sambhajinagar, senior citizen was robbed of gold jewelry at knifepoint during a morning walk. Two men on a bike threatened him, stole valuables. Police inaction is blamed for rising crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर