शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा मंदिराचा ‘कायापालट’; परिसरात विखुरलेल्या दगडांचा वापर, हुबेहूब हेमाडपंथी नक्षीकाम

By साहेबराव हिवराळे | Updated: July 25, 2023 13:11 IST

छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक खंडोबा मंदिर; त्याकाळी शिल्लक राहिलेल्या मंदिर निर्मितीतील दगडांचा वापर, नक्षीकामास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा परिसरातील मंदिराचा जीर्णोद्धार होण्यास सुरुवात झाली आहे. आधुनिक यंत्राचा वापर करत खंडोबा मंदिराचे अवशेष जोडण्यासाठी आता सुनियोजित घडणावळ सुरू झाली आहे. यंत्राचा वापर करत आता दगड चक्क हेमाडपंथी आकार घेऊ लागले आहेत.

काय झाले होते?वातावरणासह विविध कारणांनी झालेली दगडांची झीज, कलाकुसरी असूनही त्याचे बिघडलेले नक्षीकाम, ओबडधोबड झालेली घडणावळ आणि जीर्णोद्धारास आलेले मंदिर अशी काहीशी अवस्था सातारा परिसरातील खंडोबा मंदिराची झाली होती. स्थापत्य विभागाच्या देखरेखीखाली व शासकीय निधीअभावी या मंदिराचे काम रखडले होते.

काय होत आहे?मंदिर जीर्णोद्धारास आता शासकीय निधी मिळाला आहे. मंदिराच्या संवर्धनाचे काम अखेर सुरू झाले आहे. दगडावर नक्षीकाम केले जात आहे, हेमाडपंथी मंदिराच्या कलाकुसरीस धक्का न लागू देता काम सुरू झाले आहे. कारागीरांनी विशिष्ट स्थापत्य विभागाच्या देखरेखीखाली दगडाला आकार देणे सुरू केले आहे. तुटलेल्या दीपमाळेला काढून त्या जागी नवीन घडविलेल्या खणाला बसविण्यात येणार आहे.

किती जणांची टीम कार्यरत?मंदिराच्या कामासाठी ३५ तज्ज्ञ कारागिराची टीम येथे कार्यरत आहे. त्यांच्या कारागिरीतून आकार दिला जात आहे. मंदिराच्या दीपमाळेच्या तयारीसाठी तसेच सभामंडप आणि इतर घडीव दगडावर नंबर देखील टाकण्यात येत आहेत. ऑर्किटेक्ट या कारागिरांना दगडावर योग्य डिझाईन काढून देत आहेत. कोणता दगड किती फूट तसेच किती रुंद आकाराचा आहे, तो कसा मंदिराच्या नक्षीदार दगडाशी जुळेल याचादेखील अभ्यास इंजिनिअरिंगच्या टीमकडून होत आहे.

विखुरलेल्या दगडावर कोरीव काम..मंदिराच्या उभारणीत त्याकाळी शिल्लक राहिलेल्या मंदिर निर्मितीतील दगड विखुरले गेले होते, त्यातील बहुतांश दगड या टीमने त्यांच्याकडे घेऊन त्यावर नक्षीकाम सुरुवात झाले आहे.

पारंपरिक पद्धतीने काम सुरू..मंदिराच्या कळसापासून वीटकाम तसेच चुना व पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मोठ्या आकाराच्या विटा घडविण्याचे काम सुरू आहे.

दोन वर्षे काम चालणार..मंदिराच्या निर्माण कामाचा कालावधी दोन वर्षाचा असून, मंदिराच्या कळसाचे काम लवकर होईल, परंतु नक्षीकाम तसेच दीपमाळ सभामंडपाचे काम दोन वर्षांत टीम पूर्ण करणार आहे.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक