शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ चौथ्यांदा, २ तिसऱ्यांदा, एक दुसऱ्यांदा अन् ३ पहिल्यांदाच आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:53 IST

विलास भुमरे, अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव हे तिघे पहिल्यादांच विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात विजयी झालेल्या नऊ आमदारांपैकी अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रशांत बंब हे तिघे चौथ्यांदा, अतुल सावे व प्रदीप जैस्वाल हे दोघे तिसऱ्यांदा, रमेश बोरणारे दुसऱ्यांदा आणि विलास भुमरे, अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव हे तिघे पहिल्यादांच विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.

अब्दुल सत्तार : अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून आतापर्यंत सहा वेळेस निवडणूक लढविली. त्यात त्यांना २००९ पासून सतत यश आले. सहापैकी तीन वेळेस त्यांच्यासमोर सुरेश बनकर हे प्रतिस्पर्धी होते, हे विशेष.

अब्दुल सत्तारांची निवडणूक कारकीर्द अशी :सन १९९९किशनराव लक्ष्मणराव काळे - भाजपा -४३,०७९- विजयीअब्दुल सत्तार अब्दुल नबी- अपक्ष- २७,७६०- पराभूत

सन २००४सांडू आनंदा लोखंडे - भाजपा- ५४,२९० - विजयीअब्दुल सत्तार अब्दुल नबी- काँग्रेस -५३,९८९- पराभूत

सन २००९अब्दुल सत्तार अब्दुल नबी- काँग्रेस - ९८,१३१- विजयीसुरेश पांडुरंग बनकर - भाजपा- ७१,३७८- पराभूत

सन २०१४अब्दुल सत्तार अब्दुल नबी- काँग्रेस - ९६,०३८- विजयीसुरेश पांडुरंग बनकर - भाजपा- ८२,१९७- पराभूत

२०१९अब्दुल सत्तार अब्दुल नबी- शिवसेना- १,२३,३८३- विजयीप्रभाकर माणिकराव पालोदकर - अपक्ष ९९,००२- पराभूत

२०२४अब्दुल सत्तार अब्दुल नबी- शिंदे सेना -१,३७,९६०- विजयीसुरेश पांडुरंग बनकर - उद्धवसेना- १,३५,५४०- पराभूत

औरंगाबाद पश्चिमतत्कालीन महापालिकेत नगरसेवक असलेले संजय पांडुरंग शिरसाट यांना शिवसेनेने २००९ मध्ये औरंगाबाद पश्चिम एससी राखीव मतदारसंघातून उतरविले. तेव्हापासून शिरसाट यांनी सातत्याने हा मतदारसंघ कायम राखत काल झालेल्या निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळविला. विशेष म्हणजे या चारपैकी दोनदा त्यांच्यासमोर राजू शिंदे हे प्रतिस्पर्धी होते. याशिवाय आंबेडकर चळवळीचे अग्रणी गंगाधर गाडे आणि काँग्रेस जुने जाणते नेते चंद्रभान पारखे यांचाही त्यांनी पराभव केला आहे.

संजय शिरसाट यांची निवडणूक कारकीर्द अशी :२००९संजय पांडुरंग शिरसाट- शिवसेना - ५८,००८- विजयीचंद्रभान बंडूजी पारखे - काँग्रेस -४३,७९७- पराभूत

२०१४संजय पांडुरंग शिरसाट- शिवसेना -६१,२८२- विजयीगंगाधर सुखदेव गाडे -पीआरपीई -३५,३४८- पराभूत

२०१९संजय पांडुरंग शिरसाट- शिवसेना - ८३,७९२- विजयीराजू रामराव शिंदे - अपक्ष ४३,३४७- पराभूत

२०२४संजय पांडुरंग शिरसाट- शिंदेसेना - १,२२,४९८- विजयीराजू रामराव शिंदे - अपक्ष १,०६,१४७- पराभूत

जिल्ह्यात तिघे चौथ्यांदा आमदारप्रशांत बन्सीलाल बंबजिल्हा परिषदेचे रण गाजविलेले प्रशांत बंब यांनी २००९मध्ये अपक्ष म्हणून गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. तेव्हापासून ते सतत चौथ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये ते भाजपात गेले व मागील तीन निवडणुकांत भाजपाच्या तिकिटावर जिंकले.प्रशांत बन्सीलाल बंब यांची निवडणूक कारकीर्द अशी :

२००९प्रशांत बन्सीलाल बंब -अपक्ष--- --- विजयी

२०१४प्रशांत बन्सीलाल बंब - भाजपा- ५५४८३- विजयीअंबादास एकनाथ दानवे - शिवसेना - ३८२०५ - पराभूत

२०१९प्रशांत बन्सीलाल बंब- भाजपा- १०७१९३- विजयीसंतोष अण्णासाहेब माने - रा.काँ.- ७२२२२- पराभूत

२०२४प्रशांत बन्सीलाल बंब- भाजपा- १२५५५५- विजयीसतीश भानुदास बंब- राकाँ (शप) १२०५४०- पराभूत

अतुल मोरेश्वर सावे२०१४ पासून अतुल सावे सतत तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले. तिन्ही वेळेस अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत त्यांचा निसटता विजय झाला. त्यांना भव्यदिव्य विजय प्राप्त करता आला नाही. तिन्ही वेळेस एमआयएमच्या उमेदवाराने त्यांना कडवी झुंज दिली.अतुल सावे यांची निवडणूक कारकीर्द अशी :

२०१४अतुल सावे - भाजपा- ६४५२८- विजयीगफ्फार कादरी - एमआयएम-६०२६८- पराभूत

२०१९अतुल सावे - भाजपा- ९३९६६- विजयीगफ्फार कादरी - एमआयएम-८००३६- पराभूत

२०२४अतुल सावे - भाजपा- ९३२७४- विजयीइम्तियाज जलिल - एमआयएम-९१११३- पराभूत

तिघे चौथ्यांदा....प्रदीप शिवनारायण जैस्वालसन २००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना (डीलिमिटेशन) होऊन औरंगाबाद मध्य हा नवा मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघाचे पहिले आमदार ठरले प्रदीप जैस्वाल. शिवसेनेतून बाहेर पडून जैस्वाल यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून ही जागा लढविली होती. त्यानंतर २०१४ चा अपवाद वगळता जैस्वाल या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले.

प्रदीप जैस्वाल यांची निवडणूक कारकीर्द अशी :२००९प्रदीप जैस्वाल - अपक्ष- ४९९६५- विजयीसय्यद अब्दुल कदिर- राकाँ- ४१५८१- पराभूत

२०१४सय्यज इम्तियाज जलिल- एमआयएम-६१८४३- विजयीप्रदीप जैस्वाल - शिवसेना - ४१८६१- पराभूत

२०१९प्रदीप जैस्वाल - शिवसेना -८२२१७- विजयीनासेर सिद्दीकी- एमआयएम- ६८३२५- पराभूत

२०१४प्रदीप जैस्वाल - शिंदेसेना -८५४५९- विजयीनासेर सिद्दीकी- एमआयएम- ७७३४०- पराभूत

रमेश नानासाहेब बोरणारेवैजापूर मतदारसंघातून रमेश बोरणारे दुसऱ्यांदा विजयी झाले. दोन्ही वेळेस त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळविला.

२०१९रमेश बोरणारे - शिवसेना- ९६०३८- विजयीअभय कैलास पाटील - राकॉ- ३९०२०- पराभूत

२०२४रमेश बोरणारे - शिंदेसेना- १३३६२७- विजयीदिनेश परदेशी- उद्धवसेना - ९१९६९- पराभूत

चव्हाण, जाधव, भुमरे नवे चेहरेजिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले विलास भुमरे (पैठण), अनुराधा चव्हाण (फुलंब्री) व संजना जाधव हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. भुमरे यांचे वडील संदीपान भुमरे हे सतत पाच वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून आता सहाव्यांदा त्यांच्या घरात आमदारकी आली आहे. संजना जाधव यांच्या घरातही त्यांचे सासरे, सासू व पती यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर वडील रावसाहेब दानवे आणि भाऊ हेदेखील आमदार, खासदार राहिले आहेत. चव्हाण यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मात्र राजकीय घराण्यातील नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकpaithan-acपैठणkannad-acकन्नडphulambri-acफुलंब्री