शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

एक गाव, त्याला दोन आमदार; दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची गावात वाढली लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:54 IST

दोन आमदार आणि दोन खासदार असलेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

- यादवकुमार शिंदेसोयगाव : तालुक्यातील निमखेडी-उमर विहिरे-तिखी ग्रुप ग्रामपंचायत हे गाव सिल्लोड-सोयगाव आणि कन्नड-सोयगाव या दोन विधानसभा मतदारसंघांत विभागले गेले असून, या गावामध्ये प्रचारासाठी दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची दररोज लगबग वाढली आहे.

सोयगाव तालुका सिल्लोडकन्नड या दोन विधानसभा मतदारसंघांत आणि लोकसभेला जालना व औरंगाबाद या दोन लोकसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. सिल्लोड मतदारसंघातील शेवटचे गाव असलेल्या उमर विहिरे गावातील एकाच ग्रामपंचायतीला मतदान करणाऱ्या एकूण ९७२ मतदारांपैकी वॉर्ड क्र. ३ मधील २९८ मतदारांचा सिल्लोड मतदारसंघात, तर वॉर्ड क्र. १ आणि २ मधील ६७४ मतदारांचा कन्नड मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. वॉर्ड क्र. तीन हा तिखीचा असून यामध्ये १५४ पुरुष आणि १४४ महिला मतदार आहेत. हे मतदार सिल्लोड मतदारसंघाला जोडले आहेत; तर निमखेडी वॉर्ड क्र. १ मधील १९७ पुरुष आणि १८२ महिला असे ३७९ व उमर विहिरेमधील १५४ पुरुष आणि १४१ महिला असे दोन्ही प्रभागातील ६७४ मतदार हे कन्नड विधानसभा मतदारसंघाला जोडले आहेत. त्यामुळे या गावाला दोन आमदार व दोन खासदार आहेत. दोन आमदार आणि दोन खासदार असलेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

मतदान केंद्रे वेगवेगळीकन्नड व सिल्लोड या दोन विधानसभा मतदारसंघांत या ग्रामपंचायतीचे मतदार समाविष्ट केल्याने या गावांतील तिन्ही प्रभागांत वेगवेगळ्या ठिकाणी तीन मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यांतील एक मतदान केंद्र सिल्लोडसाठी, तर दोन मतदान केंद्रे कन्नडसाठी आहेत.

उमेदवारांची ओळख करणे झाले कठीणएकच ग्रामपंचायतीसाठी असलेल्या मतदारांची दोन विधानसभा मतदारसंघांत विभागणी केल्याने सिल्लोड आणि कन्नड या दोन्ही मतदारसंघांतील सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार या गावात येऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत; मात्र उमेदवारांनाच त्यांचा मतदार कोणता हेच लवकर कळत नाही. या उमेदवारांची कोंडी होत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkannad-acकन्नडsillod-acसिल्लोड