शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

छत्रपती संभाजीनगरात बँकांकडे १५ कोटींच्या नाण्यांचा डोंगर ! 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 29, 2023 17:08 IST

सर्वत्र डिजिटल व्यवहार वाढत असून कोणीच सुटी नाणी बाळगण्यास तयार नाही. एसबीआयने तर नाणी ठेवण्यासाठी चक्क डेपोच उघडला आहे

छत्रपती संभाजीनगर : व्यवहारात अनेकजण नाणी घेण्यास नकार देत असल्याने शहरातील ५ बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये तब्बल १५ कोटींपेक्षा अधिकची नाणी साठली आहेत. आघाडीची राष्ट्रीयीकृत बँक एसबीआयने डेपोच तयार केला असून त्यात ७ कोटी रुपये मूल्यांची नाणी साठविली आहेत. ५ वर्षांपासून बँकांमध्ये नाण्यांचा साठा एवढा झाला आहे की, आता शहरातील ५ करन्सी चेस्टमध्ये नाणी ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही.

डिजिटल व्यवहाराने नाण्यांचे झाले महत्त्व कमीसर्वत्र डिजिटल व्यवहार वाढत असून कोणीच सुटी नाणी बाळगण्यास तयार नाही. जिथे सुट्या पैशांचा प्रश्न येतो, तेथे लोक डिजिटल पेमेंट करीत आहेत. व्यवहारात नाण्यांचा कमी वापर होण्याचे, हे महत्त्वाचे कारण आहे.

शहरात किती करन्सी चेस्ट ?शहरात एसबीआयचे दोन करन्सी चेस्ट, याशिवाय सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक असे मिळून पाच बँकांचे ६ करन्सी चेस्ट आहेत.

नाणी देणारी मशीन बँकेतसेंट्रल बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये ‘कॉइन वेडिंग मशीन’ बसविण्यात आली आहे. यात वरील कप्प्यात नोटा टाकल्या की, दुसऱ्या कप्प्यातून तेवढ्या मूल्यांची नाणी बाहेर येतात.

प्रत्येक व्यापाऱ्याकडे ५ ते १५ हजारांची नाणीशहरात प्रत्येक व्यापाऱ्यांकडे ५ ते १५ हजार रुपयांची नाणी आहेत. त्यात १० रुपयांची नाणी जास्त आहेत. नाण्यांचा व्यवहार वाढण्यासाठी रिझर्व्ह बँक नोटा कमी देत आहे.- संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

नाण्यांचे काय करायचे? मंदिर ट्रस्टींना प्रश्नमंदिराच्या तिजोरीत भाविक नाणी टाकतात. आमच्याकडेच २१ हजार रुपयांची नाणी साठली आहेत. बँका नाणी घेत नाहीत. त्या म्हणतात, व्यवहारात चालवा. ही समस्या सर्व मंदिरांची आहे.- संदीप करवा, सचिव, श्री शिव गणेश मंदिर, अहिंसानगर.

नागरिकांनी नाणी व्यवहारात आणावीत१ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये, २० रुपयांनी नाणी व्यवहारात असून ग्राहकांनी ती स्वीकारावीत. ज्यांना नाणी लागत असतील, त्यांनी बँकांमधून घेऊन जावीत.- हेमंत जामखेडकर, कोषाध्यक्ष, एआयसीबीईएफ

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद