शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा वनरक्षक परिक्षेत ‘ऑनलाइन कॉपी’च्या तीन घटना समोर

By सुमित डोळे | Updated: August 4, 2023 11:40 IST

आदल्या दिवशी कारवाई, दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन उमेदवार रंगेहात सापडले

छत्रपती संभाजीनगर : वनरक्षक परीक्षेतील उमेदवारांना चिकलठाण्यातील शिवराणा करिअर अकॅडमीतून ऑनकॉल उत्तरे पुरविले जात असल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. यात एक आरोपी अटक होऊन संचालक सचिन गोमलाडू ऊर्फ राजपूत हा पळून गेला. तरीही वनरक्षकाच्या परीक्षेतच बुधवारी शहरातील तीन सेंटरवर ‘ऑनलाइन कॉपी’ करताना उमेदवार रंगेहात पकडले गेले. प्रवेशावेळीच कसून तपासणी होती म्हणून घोटाळेबाजांनी आधीच ठरलेल्या परीक्षार्थींसाठी सेंटरच्या बाथरूममध्ये कॉपीसाठीचे कार्ड, मख्खी हेडफोन व इतर साहित्य लपवून ते नेमके कोठे ठेवलेय, हे सांगितले गेले होते.

पहिली घटनासुराणानगर येथील बाइट्स इन्फोटेक येथे बुधवारी वनरक्षक ऑनलाइन परीक्षेचे केंद्र होते. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसह वनविभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कवडे केंद्र अधिकारी होते. परीक्षेदरम्यान त्यांना नितीन संजय बहुरे (वय १९, रा. घोडेगाव) हा कच्च्या कागदावर काहीतरी लिहिताना आढळला; परंतु तो पेपर सोडवत नव्हता. संशय आल्याने त्याची अंगझडती घेतल्यावर मोबाइल, मास्टर कार्ड रिडर, कानात मख्खी हेडफोन आढळला. मित्र करण चत्तरसिंग गुसिंगे (रा. पिवळवाडी) याने त्याला पैशांच्या बदल्यात उत्तर पुरविण्याचे काम घेतले होते. केंद्रावर जाताच बाथरूममध्ये साहित्य कुठे ठेवले, हे सांगितले होते. नितीनने परीक्षा सुरू झाल्यावर लघुशंकेचा बहाणा करून साहित्य आणून टेलिग्रामवर फोटो पाठवीत होता. जिन्सी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दुसरी घटनाचिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल येथे सचिन अंबादास राठोड हा परीक्षार्थी परीक्षा सुरू असताना अचानक लघुशंकेला जाऊन आला. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल मराठे यांना संशय आल्याने तपासणी केली असता त्याच्याकडे वायर्ड हेडफोनचा सेटच आढळून आला. त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.

तिसरी घटनाबीड बायपासवरील एक्सलन्स कॉम्प्युटर सेंटर येथे बी.ए. उत्तीर्ण सतीशसिंग मदनसिंग जारवाल (२८, रा. गंगापूर) हा असाच रंगेहात सापडला. मख्खी हेडफोन, सीमकार्डचे इलेक्ट्रिक ब्लू टूथ डिव्हाइसद्वारे समोरील व्यक्ती त्याला उत्तरे पुरवीत होती. यासाठी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद