शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
6
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
7
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
8
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
9
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
10
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
12
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
13
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
14
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
15
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
16
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
17
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
19
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
20
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांना गुन्हेगारी आवरेना; सलग दुसऱ्या दिवशी लुटमारीच्या घटना

By सुमित डोळे | Updated: March 1, 2025 19:10 IST

छत्रपती संभाजीनगरात फेब्रुवारीत लुटमारीच्या ३० पेक्षा अधिक घटना

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सामान्यांना राजरोस शस्त्रांचा धाक दाखवून, मारहाण करून लुटले जात असताना पोलिसही गुंडगिरी, गुन्हेगारी थांबवण्यात अपयशी ठरत आहेत. गेल्या २४ तासांत सुतगिरणी चौकात एका फळ विक्रेत्याला लुटण्यात आले तर अदालत रोडवरील ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला सहा जणांच्या टोळीने थेट खंडणीची मागणी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

घटना १ : अल्पवयीन मुलाकडून चाकू हल्लादोन दिवसांपूर्वी इंदिरानगरमध्ये पैशांसाठी तरुणाचा गळा कापण्यात आला. जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीतच पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता सुतगिरणी चौकात फळविक्रेते रामेश्वर कोरडे (४१, रा. उल्कानगरी) यांना दोघांना लुटले. सागर मिसाळ (२०, रा. देवळाई चौक) व एका गजानननगरच्या अल्पवयीन मुलाने त्यांना पैशांची मागणी केली. त्यांनी नकार देताच अल्पवयीन मुलाने चाकू काढून भिरकावला. सागरने त्यांच्या खिशातील ४ हजार रोख, मोबाइल काढून पळ काढला. कोरडे यांच्या मुलाने पाठलाग करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी दगड फेकून जखमी केले. अल्पवयीन मुलगा पकडला गेल्याने सागरचे नाव निष्पन्न झाले.

घटना २ : खंडणीसाठी मारहाणविनय ढाकेंच्या (३५) रॉयल चिंतामणी टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसायाचे अदालत रोडवर कार्यालय आहे. २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता सिल्लेखान्याच्या जाकिर कुरेशीने कार्यालयात जात पैशांची मागणी केली. ढाके यांनी नकार दिला. जाकिर थोड्या वेळाने शस्त्रधारी गुंडांसह गेला. ‘हमारे इलाके में रेहकर धंदा करता है और हमको दारुको पैसे नहीं देता’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सहकाऱ्याचा मोबाइल फोडला. पुन्हा कार्यालय उघडल्यास हात-पाय तोडण्याची धमकी दिली.

घटना ३ : तरुणाला लुटलेरोहन भालेराव (२१) हा २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता मावस भावासोबत भाजी खरेदीसाठी जाधववाडीत गेला होता. तेव्हा आरोपी कुणाल जाधव, गौरव ऊर्फ बग्या व अन्य एकाने त्यांच्यावर हल्ला चढवला. चाकूने वार करून खिशातून ५ हजार रोख, मोबाइल हिसकावून निघून गेले. स्थानिकांकडून त्यांच्या घराची माहिती मिळतच भालेराव यांनी त्याचे घर गाठले. तेव्हा कुणालच्या आईने त्यांनाच धमकावत अंगावर धावून गेली. शिवाय, कुणालला पळवून लावले. पंधरा दिवसांपूर्वीच याच कुणालने एका व्यावसायिकाला लुटले होते. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना अटक केल्याचे सहायक निरीक्षक नितीन कामे यांनी सांगितले.

गतवर्षीचा रेकॉर्ड यंदाही कायमगतवर्षी लुटमारीच्या १९४ तर घरफोडीच्या १४८ घटना घडल्या होत्या. यंदा जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये लुटमार, शस्त्रांचा धाक दाखवून किमान ५५ नागरिकांना लुटण्यात आले. यात केवळ पुंडलिकनगर व एमआयडीसी सिडको पोलिसांनी शोध घेत टोळ्यांना अटक केली. उर्वरित गुन्हे शाखा, पोलिस ठाणे सपशेल अपयशी ठरले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी