शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी- कर्मचाऱ्यांविना, योजना राबविताना अडचणीच अडचणी 

By स. सो. खंडाळकर | Updated: November 13, 2023 15:47 IST

ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात.

छत्रपती संभाजीनगर : ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी व कर्मचाऱ्यांविनाच चालवावा लागत असून योजना राबवताना अनेक अडचणींना समाोरे जावे लागत असल्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात. ही दुरवस्था पाहून मध्यंतरी सामाजिक न्याय विभागाकडून ६६ अधिकारी व कर्मचारी ओबीसी मंत्रालयाकडे वर्ग करण्याचा शासननिर्णय घेण्यात आला. पण तो अद्याप तरी कागदावरच असल्याचे दिसून येते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ च्या शासन आदेशान्वये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले होते व ३७० अधिकारी व कर्मचारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून वर्ग करण्यास मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात असे घडले नाही.तांडा वस्ती सुधार योजना, अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण वसाहतमुक्त योजना दारिद्र्य रेषेखालील ओबीसींना घरकुल योजना देणाऱ्या आहेत. मात्र जिल्हा स्तरावर अधिकारीच नसल्याने या योजनांना उद्दिष्ट गाठता आले नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांप्रमाणे जिल्हा ओबीसी कल्याण अधिकारी नियुक्त करून ओबीसींच्या योजना राबविण्यावर भर देण्याची गरज असताना शासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. जिल्ह्यात असे अधिकारी नेमण्याची मागणी विविध ओबीसी संघटनांनी वारंवार निवेदने देऊन केली. पण त्याची दखल घेतली गेली नाही.

तब्बल १८ योजनांवर परिणामविमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृ्ती अंतर्गत एकूण नऊ योजना तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नऊ योजना अशा एकूण १८ योजना असून त्या अधिकारी व कर्मचारीच नसल्याने राबवता येत नाहीत. पंतप्रधान मोदी आवास योजनेला दहा लाख ओबीसींना घरकुल देण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु अधिकारी व कर्मचारीच नसल्याने या योजनेलाही खो बसत आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावे