शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

'...तर लोक तुम्हाला हंड्याने मारतील', इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:39 IST

Imtiaz Jaleel: "तुम्ही अनेक वर्षे शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही."

औरंगाबाद:औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. 

'भाजपने नौटंकी बंद करावी'आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं. ''शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झाला आहे. त्यावर बोलण्याची गरज आहे, ही मोर्चाची नौटंकी बंद करा. शहराचा पाणी प्रश्न अधिकाऱ्यांसोबत बसून सोडवण्याची गरज आहे. पण, भाजप त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांना यातही राजकारण करायचं आहे,'' असं जलील म्हणाले.

'लोकं तुम्हाला हांड्याने मारतील'ते पुढे म्हणाले की, "इतके वर्षे तुम्ही शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही. तेव्हा तुम्ही शिवसेनेसोबत लुटून खाल्ले, आता नौटंकी सुरू आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो की, तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा. लोक तुम्हाला हंड्याने मारतील," असंही जलील म्हणाले.

'पाणी पट्टी व्याजासह परत करा'यावेळी जलील यांनी पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली. "नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी. भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद