शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; औरंगाबाद व नांदेड येथे पोलिसांवर दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:34 IST

भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला.

मराठवाडा : भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. दगडफेकीत औरंगाबाद येथे १ तर नांदेड येथे ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

सोमवारी भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्त भारिप बह्जून महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विविध संघटनाश घोषित केलेल्या महाराष्ट्र बंदला आज सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांनी ठिकठिकाणी एकत्र येत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मराठवाड्यातील सर्वच ठिकाणी बाजारपेठा उत्स्फूर्तपणे बंद होत्या. यासोबतच सर्व भागातील बस सेवा तसेच खाजगी वाहतूकही बंद होती. मुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. रेल्वे स्थानकावर सुद्धा बंदचा परिणाम दिसून आला.

आंबेडकर नगरात दगडफेक औरंगाबाद येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेल्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तेथे जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात एक पोलीसा कर्मचारी जखमी झाला. तसेच नांदेड येथील आंबडेकर नगरातही जमावाकडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाली व गाडीचे नुकसान झाले. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार