शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

पतीला पेटवून देत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 14:08 IST

वैद्यकीय अहवालानुसार सरोदे ५० टक्के भाजले होते.

ठळक मुद्देदहा वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाचा निकाल

औरंगाबाद : त्रास देत असल्याच्या कारणावरून पती संजय सरोदे यांना पेटवून देत खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कांचन ऊर्फ हिराबाई आणि दोन मेहुणे संजय आणि अशोक साठे यांना सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी गुरुवारी (दि. २८) प्रत्येकी दहा वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. 

यासंदर्भात संजय रमेश सरोदे (३३, रा. पवननगर, एन-९, सिडको) यांनी तक्रार दिली होती की, ४ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त संजयची पत्नी कांचन हिने तिचा भाऊ संजय, अशोक, आई कांताबाई (५५) व वडील दामोधर मरिभा साठे (६५) यांना घरी बोलाविले होते. ते सर्व दुपारी ४ वाजेच्या सुमारास सरोदे यांच्या घरी आले. सरोदे इमरतीच्या तिसऱ्या मजल्यावर झोपलेले होते. त्यावेळी कांचन हिने सर्व आरोपींना सरोदे यांच्या खोलीत नेले. तेथे आरोपी अशोक याने सरोदे यांना लाथ मारून उठविले व शिवीगाळ करीत माझ्या बहिणीला त्रास का देतो, असे म्हणत सरोदे यांना अशोक व त्याच्या आई-वडिलांनी घट्ट पकडले. त्यानंतर कांचन हिने  पती सरोदेच्या अंगावर रॉकेल ओतले. आम्ही तुला जाळून मारून टाकतो, असे म्हणत संजय साठे याने सरोदे यांना आग लावली.

सरोदे यांनी आरडा-ओरड केल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले. शेजाऱ्यांनी आग विझवून सरोदेंना सिडको पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सरोदे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार सरोदे ५० टक्के भाजले होते.

खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती  न्यायालयाने वरील तिघा आरोपींना भादंवि कलम ३०७ अन्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला, तर कलम ३२३ अन्वये प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरी व कलम ५०४ अन्वये प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.  आरोपी कांताबाई व दामोधर साठे या दोघांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. अ‍ॅड. देशपांडे यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

टॅग्स :fireआगCourtन्यायालयAurangabadऔरंगाबाद