शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वासामागे दडले पदाधिकाऱ्यांचे ‘इंटरेस्ट’!

By admin | Updated: April 3, 2015 00:42 IST

बीड : जिल्हा परिषदेचा ‘रिमोट’ हाती ठेवून कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीतील ‘सिनीअर’ नेत्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे.

बीड : जिल्हा परिषदेचा ‘रिमोट’ हाती ठेवून कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीतील ‘सिनीअर’ नेत्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे. सवते सुभे जपताना अस्तित्व, प्रतिष्ठेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीला आणखीच धार येत असून राष्ट्रवादीतील टोकाची रस्सीखेच भाजपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या खेळामागे पदाधिकाऱ्यांचे वेगवेगळे ‘इंटरेस्ट’ दडल्याची माहिती पुढे येत आहे.जिल्हा परिषदेची सत्ता काबिज केल्यावर राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरुन चुरस होती. ज्या गटाचे सर्वाधिक सदस्य त्या गटाचा अध्यक्ष असा सरळसाधा नियम लावण्यात आला. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे सर्वाधिक सहा सदस्य होते. त्यामुळे ‘लाल दिव्या’चा मान धस गटाला मिळाला होता. अडीच वर्षानंतर विधानसभा निवडणुका लागल्या अन् गेवराईत दोन पंडितांमधील वैर संपुष्टात आणून शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण केले. बदामरावांना विधानसभेची अन् जि.प.अध्यक्षपदासाठी विजयसिंहांना उमेदवारी देण्याचा छुपा ‘करार’ झाल्याची चर्चाही तेंव्हा रंगली होती. दरम्यान, पंडितांच्या एकीचे ‘रिअ‍ॅक्शन’ झाल्याने बदामरावांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले. इकडे जिल्हा परिषदेत मात्र विजयसिंहांची जादू चालली. अमरसिंह पंडित आधीच विधानपरिषदेत पोहोचलेले होते तर त्यांचे छोटे बंधु विजयसिंह जिल्हा परिषदेचे कारभारी झाले. बदामराव पंडित यांचे पुत्र युद्धजीत पंडित यांना पुन्हा जि.प. सभापतीपदाची संधीही दिली नाही.बदामराव पंडित ‘बॅकफूट’वर गेल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर कायम आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसोबत आ.अमरसिंह पंडित यांची जवळीक वाढलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही नेते अस्वस्थ आहेत. शिवाय आ. पंडित हे भाजपाच्याही निशाण्यावर आहेत. (प्रतिनिधी)जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यावर अविश्वास ठराव आणून पंडित घराण्यांचे पंख छाटण्यासाठी राष्ट्रवादीतील काही पदाधिकारी पुढे येत असतील तर भाजपानेही त्यांना बळ देण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे तूर्त विजयसिंहांपुढील अडचणी वाढल्या असून स्वकियांसोबतच विरोधकांचे वार झेलण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. या आव्हानाला ते कसे सामोरे जातात? हे कळेलच.जि.प. मध्ये गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. उपलब्ध निधी नसताना जास्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुऱ्या दिल्या. मात्र, बहुतांश कामे सत्ताधाऱ्यांतील बड्या नेत्यांची आहेत. विरोधी बाकावरील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही वित्त आयोग, झेडपीआरमध्ये दबदबा राखला आहे. तत्कालीन सीईओंना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. विशेष लेखा परिक्षणाचा ससेमिरा मागे लागलेला असताना काही पदाधिकारी रद्द झालेली कामे पुनर्जिवीत करुन बिले उचलण्याच्या तयारीत आहेत. अध्यक्ष विजयसिंह यांनी ‘नियम म्हणजे नियम’ हा मंत्र जपल्याने त्यांच्यावर ‘अविश्वास’ दाखवला जात असल्याचे सांगितले जाते.