शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले, 'महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 20:55 IST

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

ठळक मुद्देमी डॉक्टर आहे, तुम्हाला निराश करणार नाहीडॉ. कराड यांनी सांगितले पीएमओमधून फोन आल्यानंतर काय घडले

औरंगाबाद : ''राज्यातून केंद्रीय मंत्री कोण होणार या चर्चेतही माझे नाव नव्हते अन अचानक मला पीएमओमधून फोन आला. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) , भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ( J.P. Nadda ) यांची भेट झाली आणि त्यानंतर शपथविधी झाला,'' असा थक्क करणारा प्रवास उलगड होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड( Bhagwat Karad ). त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी एका बैठकीदरम्यान  'महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील' असे म्हटले. त्यावर मी डॉक्टर आहे, तुम्हाला निराश करणार नाही असा शब्द दिल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. ते लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा ( Rajendra Darda ) यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. ( "Important ministerial posts have been given, we have to work hard"; Dr. Karad told what happened after the phone call from the PMO )   

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले. भाजपकडून राज्यातून मंत्रीमंडळात कोण स्थान पटकावणार याची जोरदार चर्चा मंत्रीमंडळ विस्ताराच्या पूर्वी सुरु होती. परंतु, यात डॉ. कराड यांचे नाव नव्हते. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत डॉ. कराड यांची प्रधानमंत्र्यांनी अर्थ राज्यमंत्री पदी निवड केली. यामुळे सर्वांना डॉ. कराड यांची मंत्रीपदी निवड कशी झाली ? त्या दोन दिवसात काय घडले याची उत्सुकता आजही आहे. यावर आणि औरंगाबाद तसेच महाराष्ट्रासाठीच्या व्हिजनवर लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांनी डॉ. कराड यांना बोलते केले. 

डॉ. कराड यांनी यावेळी त्यांचा राजकारणात प्रवास लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांच्यामुळे झाल्याचे नमूद करत मंत्रीपद मिळण्याच्या आधी काय घडले हे उलगडले. ते म्हणाले, ''केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. मी औरंगाबादमध्येच होतो, अचानक पीएमओमधून फोन आला. तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत दिल्लीला येयचे आहे. का बोलवले असेल हे मी समजलो. मात्र, पुढचे काही तास तर मंत्रीपदी निवड झाल्यावर विश्वासच बसत नव्हता. मी तो नंबर खरेच पीएमओचा आहे का हे तपासून खात्री केली. त्यानंतर पुणे येथून दिल्ल्लीला गेलो आणि दुसऱ्यादिवशी संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यासोबत इतर खासदारही होते. मोदीजी यांनी तुमची मंत्रीपदी निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर शपथविधी झाला' डॉ. भागवत कराड सांगत असलेला हा रोमांचक प्रवास औरंगाबादमधील प्रतिष्ठित नागरिक थक्क होऊन ऐकत होते. मंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर एका बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांनी, मोठे आणि महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील असे सांगितले. यावर मी डॉक्टर आहे, कष्ट करण्याची मला सवय आहे. तुम्हाला निराश करणार नाही, असा शब्द दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. 

औरंगाबादचा करणार कायापालटरेल्वे, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील औरंगाबादचे सामर्थ्य वाढविण्यासाठी दीर्घकालीन लाभ योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. शहरात बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे मसुरी सारखे केंद्रीय केंद्र सुरु करण्याचा संपल्प त्यांनी बोलून दाखवला. शहराची कनेक्टीव्हिटी वाढवणे, नवीन उद्योग शहरात आणणे, अजिंठा-वेरूळ-दौलताबाद या समृद्ध पर्यटन क्षेत्राचा येत्या काळात चेहरा बदलण्याची योजना तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमतAurangabadऔरंगाबादBJPभाजपा