शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा, १० रुपयांत जेवण योजनेची अंमलबजावणी हवी;शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:13 IST

सरकार कोणतेही आले तरी जीवनात फारसा फरक पडत नाही

ठळक मुद्दे१० रुपयांच्या जेवणाचे झुणका-भाकरीसारखे होऊ नये

औरंगाबाद : महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर पहिले शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे, तर शिवसेनेने वचननाम्यामध्ये १० रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचे झुणका-भाकर योजनेसारखे होऊ नये, अशी शंका महिला मजुरांनी व्यक्त केली. 

राज्यात महाविकास आघाडी सत्ता स्थापन करीत आहे. या पार्श्वभूमीवर जाधववाडीत धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकरी व महिला मजुरांशी संवाद साधला असता त्यांनी  बोटावरची शाई  मिटली, पण अजूनही सत्ता स्थापन झाली नसल्याची खंत व्यक्त केली. शेतकरी असो किंवा  महिला मजूर, यातील एकालाही आपली परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही. सरकार कोणतेही येवो आमच्या जीवनात काहीच परिवर्तन घडणार नाही,   अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि मजूर महिलांनी व्यक्त केली. 

राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यावर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करावा, अशी मागणी केली, तर काहींनी १० रुपयांत पोटभर जेवण देण्याच्या योजनेचे झुणका भाकर योजनेसारखे होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.  राज्यकर्त्यांच्या जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. खराब झालेली छबी दुरुस्त करण्यासाठी महाविकास आघाडी कसे काम करते, हे येत्या काळात कळेलच.

शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत. त्यांनी निवडणुकीत व निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता त्याची पूर्ती करण्याची वेळ आहे. दिलेला शब्द नव्या मुख्यमंत्र्यांनी पाळावा.-रामराव खताळ, शेतकरी (सातारा)

महाविकास आघाडीकडून अपेक्षा उद्धव ठाकरे मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करतील, अशी खात्री वाटते. महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे. यामुळे त्यांना काम करावेच लागेल. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व खते, कीटकनाशके कमी दरात मिळावीत ही मागणी आहे. - शेख बशीर, शेतकरी (सावंगी)

विश्वास उडाला शिवसेनेने यापूर्वी झुणका-भाकर योजना आणली होती. तिचे काय झाले सर्वांना माहिती आहे. आता १० रुपयांत जेवण देणार असे म्हणतात; पण आमचा सरकारवर विश्वास राहिला नाही. अशा अनेक योजना येतात व जातात, त्याचा फायदा मजुरांपर्यंत पोहोचतच नाही. -आशाबाई बनकर, मजूर

कष्टाचा पूर्ण मोबदला द्या लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा जे दिवसभर राबून कष्ट करतात त्यांच्या कष्टाला पूर्ण मोबदला मिळावा. मात्र, आम्हाला दिवसभरात अवघे कोणाला १५० ते कोणाला २५० रुपयेच मिळत आहेत. मजुरीत वाढ व्हावी. २० दिवस काम मिळते, तर १० दिवस घरी बसावे लागते. कोणतेही काम तात्पुरते असते. वर्षभर पुरेल एवढ्या कामाची हमी द्यावी. -प्रीती शेजवळ, मजूर 

सरकार कोणतेही येवो, आमच्या नशिबी कष्टच सरकार कोणतेही येवो, आमच्या नशिबी अपार कष्टच आहेत. निवडणुकीत नुसत्या घोषणा होतात; पण प्रत्यक्षात काहीच हाती पडत नाही. पूर्वी जे काम मिळत होते आता मंदीमुळे तेही काम मिळत नाही. जे स्वाभिमानी राहून कष्ट करतात त्यांच्यासाठी कोणतीच योजना सरकार आणत नाही. आजही पुरुषांच्या तुलनेने जास्त काम करूनही महिला मजुरांना मजुरी कमीच मिळते. याकडे कोणी लक्ष देणार का?              -अलका एडके, मजूर

जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेतसरकार कोणाचेही येवो याचे आम्हाला काही घेणे-देणे नाही. मात्र, जे सत्तेवर येईल त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ७/१२ कोरा होणे हे महत्त्वाचे. ओल्या दुष्काळाची पूर्ण नुकसानभरपाई मिळावी, हीच मागणी आहे.     -रामराव भेसर, शेतकरी (मांडकी)

टॅग्स :agricultureशेतीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद