शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावातून अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 19:56 IST

वाळूज महानगर: तीसगाव पाझर तलावातून वाळू माफिया अवैधपणे वाळूचा उपसा करील असल्याचे उघडकीस येत आहे. वाळूच्या नावाखाली माती मिश्रित वाळू विकून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे महसूल प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वाळूज महानगर: तीसगाव पाझर तलावातून वाळू माफिया अवैधपणे वाळूचा उपसा करील असल्याचे उघडकीस येत आहे. वाळूच्या नावाखाली माती मिश्रित वाळू विकून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे महसूल प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वाळूज महानगर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने सध्या वाळूला भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करुन वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया विविध ठिकाणांहून अवैधपणे माती मिश्रित वाळूचा उपसा करीत आहेत.

लांझी, धामोरी, विटावा आदी ठिकाणासह आता तीसगावच्या पाझर तलावातूनही मोठ्या प्रमाणात मातीमिश्रित वाळूचा उपसा केला जात आहे. वाळूचा तुटवडा असल्याने वाळू माफियाकडून तलावातून माती मिश्रित वाळू आणून खामनदी, सिडको परिसरात अर्धवट धुवून तिच वाळू नागरिकांना चढ्या भावाने विकली जात आहे.

वाळूज महानगरात रात्रंदिवस हायवा अवैध वाळूची वाहतूक करीत आहेत. अनेकदा या वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडल्याने या वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे. या विषयी तहसीलदार रमेश मुनलोड म्हणाले की, पाहणी करुन अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई केली जाईल.

महसूल विभागाचे पथक नावालाच ..शासनाचा महसूल बुडवून अवैध गौण खनिजाची चोरी करणाºयावर कायदेशीर कारवाई करण्यसाठी प्रशासनाने महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. वाळूज महानगर परिसरात अनेक दिवसांपासून वाळू व मुरुमाची अवैधरित्या चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नसल्याने महसूल विभागाची पथके नावालाच आहेत की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsandवाळू