शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:31 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे२९० लघु प्रकल्प कोरडे : टंचाईच्या झळा, चारा छावणीत पावणेचार लाख जनावरे

औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. विभागातील जलसाठ्यांतील पिण्याचे पाणी जोत्याखाली गेले असून, ४ टक्के पाणी सर्व प्रकल्पांत शिल्लक राहिले आहे. ३५ लाख नागरिकांना २,२०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागाची ही भीषणता राजकीय धावपळ आणि प्रशासनाच्या कोंडीत अडकली आहे.मराठवाड्यात सर्व मिळून ६७ लाख जनावरे आहेत. त्यात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे, शेळ्या, मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. विभागात दररोज २६ हजार ३३० टन चारा लागतो. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या ६०५ चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या आता ३ लाख ७५ हजार ६५७ झाली आहे. यंदा दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासूनच चाराटंचाई होती. सर्वाधिक चाराटंचाई बीड जिल्ह्यात असून, ५६२ चारा छावण्यांत ३ लाख १९ हजार ९७२ मोठी, तर २८ हजार ७२ मोठी जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ छावण्यांत २३ हजार ६४८ मोठी, तर २ हजार ८९२ लहान, अशी एकूण २६ हजार ५४० जनावरे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चारा छावण्या उशिराने सुरू झाल्या असून, एका छावणीमध्ये ८६४ मोठी, तर २०९ लहान, अशी १ हजार ३ जणावरांच्या चारा- पाण्याची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ८७२, उस्मानाबाद जिल्ह्यात ६१, तर औरंगाबाद जिल्ह्यात एका चारा छावणीला मंजुरी देण्यात आली आहे.एका महिन्यात १६ प्रकल्प झाले कोरडेमराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३० कोरडे पडले आहेत. ३१ प्रकल्प जोत्याखाली आहेत, तर ११ प्रकल्पांत २५ टक्के पाणी आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी २९० कोरडे पडले आहेत. १ महिन्यात १६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. गेल्या महिन्यात २६४ प्रकल्प कोरडे होते. ३०७ प्रकल्प जोत्याखाली असून, ११३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ८७२ प्रकल्पांत ४ टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडा