शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित

By विजय सरवदे | Updated: March 27, 2024 14:02 IST

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळेवर दिली जात नाही, अशी आवई उठविली जाते. परंतु, महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून हे अर्ज दाखल करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्ती अर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही जिल्ह्यातील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. यासाठी आता ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी समाज कल्याण विभागाने ‘महाडीबीटी पोर्टल’ सुरू केले. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर भरलेल्या अर्जांची पडताळणी करून महाविद्यालयांनी ते समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड करायचे असतात; पण प्रामुख्याने काही नामांकित महाविद्यालयांना त्यासाठी वेळ मिळत नसल्याचे प्रलंबित अर्जांच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी २० हजार ८७४ अर्ज महाविद्यालयांकडून समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड झाले. प्राप्त अर्जांपैकी २० हजार ८७१ अर्ज समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत जवळपास ८ हजार अर्ज अजूनही अप्राप्त आहेत. विद्यार्थी व महाविद्यालयांना या दोघांसाठीही आता ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे.

महाविद्यालय जबाबदारसमाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी महाविद्यालयांना इशारा दिला आहे की, शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असेल. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन त्याची छाननी करावी व परिपूर्ण अर्ज ३१ मार्चपूर्वी समाज कल्याण विभागाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावेत.

- २९,६५३ विद्यार्थ्यांना गत वर्षी शिष्यवृत्तीचे वाटप- २०,८७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत समाज कल्याणला प्राप्त- ४,१८६ अर्ज महाविद्यालयांच्या लॉगिनवर पडून- ४००० विद्यार्थ्यांनी अजूनही अर्जच भरलेले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रScholarshipशिष्यवृत्ती