शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 20:04 IST

परशुरामाची १५ फुट उंचीची आणि सुमारे २ क्विंटल वजनाची भव्य मूर्ती दौलताबाद रोडवरील दत्त मंदिर परिसरात

छत्रपती संभाजीनगर : भगवान विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा ! येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात २०१९ मध्ये उभारलेली ही जिल्ह्यातील पहिली भव्य मूर्ती भक्तांचे आकर्षण ठरत आहे.

यंदाच्या परशुराम जयंतीनिमित्त (मंगळवारी) ही मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहे. नव्या पिढीला भगवान परशुरामांचे शौर्य, पराक्रम आणि मानवतेसाठीचे कार्य माहीत व्हावे, यासाठीच या मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती.

१५ फूट उंचीची भव्य मूर्तीपिळदार, बलदंड शरीरयष्टी असलेली ही तेजस्वी मूर्ती १५ फूट उंच आहे आणि सुमारे २ क्विंटल वजनाची आहे. उजव्या हातात परशू आणि डाव्या हातात धनुष्य धारण केलेले परशुराम युद्धासाठी सज्ज असल्याचे भासते. पदमपुऱ्यातील प्रसिद्ध मूर्तिकार सुंदरलाल कुमावत यांनी ही मूर्ती तयार केली आहे.

कोणी घेतला पुढाकार?अ. भा. ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक, शंतनू चौधरी आणि मिलिंद पिंपळे यांनी २०१९ मध्ये या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याच वर्षी भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या दिवशी विधिवत पूजा व आरती करून ही भव्य मूर्ती माधव पाठक यांच्या दत्त मंदिराबाहेर उभारण्यात आली.

हडको येथे भव्य मंदिराची उभारणीहडको, एन-१२ परिसरातील विवेकानंदनगर येथे प्रभू श्रीराम आणि भगवान परशुराम यांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. खा. भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास विभागामार्फत मंजूर कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच १९ एप्रिल रोजी पार पडला. खा. संदीपान भुमरे आणि आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते या मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पासाठी तब्बल ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून, एक वर्षाच्या आत मंदिर उभे राहणार आहे.

परशुरामाचे पहिले मंदिर विवेकानंदनगरातविवेकानंद नगरातील मंदिरात भगवान परशुरामांची अडीच फूट उंचीची संगमरवरी मूर्ती जयपूरहून आणली आहे. याचबरोबर, दौलताबाद रोडवरील विद्यमान १५ फूट उंचीची भव्य मूर्तीही नवीन मंदिरात मुख्य दर्शनी भागात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. हे भगवान परशुरामांचे मंदिर जिल्ह्यातील पहिले मंदिर ठरले.- सुधीर नाईक, जिल्हाध्यक्ष, अ. भा. ब्राह्मण महासंघ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर