शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढाबा, हाॅटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल !

By राम शिनगारे | Updated: May 31, 2023 20:03 IST

चार महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाची १६० ढाब्यांवर कारवाई, ४१६ गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी चालू वर्षातील सुरुवातीच्या चार महिन्यांत तब्बल १६० ढाब्यांवर अवैध दारू विक्री, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे कारवाई केली आहे. त्याशिवाय एकूण ४१६ गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

चार महिन्यांत शेकडो जणांवर कारवाईराज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ३५, फेब्रुवारीत ४१, मार्च ३७ आणि एप्रिल महिन्यात ४७ ढाब्यांवर कारवाई केली आहे. त्याशिवाय चार महिन्यात एकूण ४१६ गुन्हे नोंदविले आहेत. त्यात ४५० आरोपींना अटक केली आहे. त्याशिवाय लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

ढाबा मालकावरही कारवाईपरवाना नसताना दारू विक्रीस ठेवणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे ढाबा मालकांवर गुन्हे नोंदविण्यात येतात. या गुन्ह्यात ढाबा मालकास मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येतो. त्याशिवाय त्याठिकाणचे साहित्यही जप्त करण्यात येते.

दारूच्या किमतीपेक्षा दंड जास्तउत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ढाब्यावर दारू पिताना पकडल्यानंतर होणार दंड संबंधित दारूच्या बॉटलपेक्षा जास्त प्रमाणात असतो. त्याशिवाय ढाबा मालकासही दारूच्या किमतीपेक्षा अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अवैध दारू विकणाऱ्या ढाब्यावाल्यांना महागात पडते.

हातभट्टीचा चालकांवर कारवाईउत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी चार महिन्यांमध्ये हातभट्टी चालकांच्या विरोधात ३७ गुन्हे नोंदवले आहेत. त्याशिवाय दारूबंदी कायद्यानुसार ९३ अन्वये २०२२-२३ मध्ये १४० प्रस्ताव दाखल केले आहेत. एप्रिल २०२३ मध्ये ४६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्याचवेळी एमपीडीए अंतर्गत एकूण २९ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

विभागाने उघडली मोहीम उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, ढाब्यांवर नियमबाह्यपणे दारू विक्रीसह पिण्यास जागा उपलब्ध करून दिल्यामुळे संबंधितांवर कारवाई केली आहे. त्याशिवाय हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात तर मोहीमच उघडण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हातभट्टी बंद करण्यात यशही मिळत आहे.- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय