शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

आता झाडे जगविली नाही तर खावी लागेल जेलची हवा; येणार नवा कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:50 PM

दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृहपेक्षा वेगळ्या शिक्षेची तरतूद असणार

ठळक मुद्देमराठवाड्यात ९ कोटी २८ लाखांचे उद्दिष्टअन्यथा जेलची हवा खावी लागणार

औरंगाबाद : ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत सर्वच विभाग मिळून ९ कोटी २८ लाख वृक्ष लावणार आहेत. यंदापासून झाडाच्या लागवडीनंतर जोपासना न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृह परिसरात झाडे लावण्याची शिक्षा ठोठावणारा कायदा केला जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मराठवाडास्तरीय महसुली विभागाची आढावा बैठक सोमवारी वाल्मी येथे पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झाडे लावा ही सक्ती न राहता प्रत्येकाने स्वत:हून पुढे यावे आणि झाडे लावून त्यांची जोपासना करण्यावर भर दिला पाहिजे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास वनवृत्त शिवाराची जोड दिली असून ‘वन है तो जल है, जल है तो कल है’ म्हणून पाण्याचे महत्त्व अबाधित आहे. या सर्व प्रकारामुळे वनक्षेत्रातील जलसाठे ४३२ चौरस किमीने विस्तारले आहेत. 

देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यावर यंदा वन विभागाने भर दिला आहे. घनदाट अरण्य ही नवीन संकल्पना रुजवली जात आहे. प्रत्येक नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद यांना कमी जागेत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. फळ झाड, बांबू क्षेत्राचे उद्दिष्ट वाढविणे गरजेचे असून, कृषी विभागाला देखील तसे कळविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूला वृक्ष लागवडीचे नियोजनातच ठरविलेले आहे. त्यामुळे त्यांनी लक्षपूर्वक झाडांची लागवड करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.   

प्रयोग यशस्वीइको बटालियन, आर्मीच्या वतीने अब्दीमंडी, शेंद्राबन परिसरात झाडे लावली. आता यंदा निरगुडी, रसूलपुरा, शेंद्रा, सुलतानाबाद  या क्षेत्रात झाडे लावण्याचे ठरविले आहे. त्यांना लातूर आणि उस्मानाबाद या भागातही वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. 

बांबूवर आधारित कौशल्य विकास केंद्रमहाराष्ट्र राज्य बांबू विकास महामंडळ, बांबू प्रशिक्षण व संशोधन संस्था, चिंचपल्ली पुणे, राहुरी, संत गाडगे महाराज विद्यापीठ, अमरावती या ठिकाणी बांबूवर आधारित कौशल्य विकास केंद्र स्थापन केले आहे. विविध उपक्रमांमुळे बांबूचे क्षेत्र वाढले आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व विविध मान्यवरांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforestजंगलState Governmentराज्य सरकार