शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास मिळणार 'या' योजनेचा आधार ! अर्ज प्रक्रिया सुरू 

By विजय सरवदे | Updated: June 20, 2024 17:58 IST

४५० विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार केली जाणार निवड

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या धरतीवर शासनाने आता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक पी.जी. वाबळे यांनी कळविले आहे की, बारावी उत्तीर्ण ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत. असे विद्यार्थी निवास व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या १५०, तृतीय वर्षाच्या १५० आणि चतुर्थ वर्षाच्या १५० अशा एकूण ४५० विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे.

काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना?राज्यातील गरजू आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक साहाय्य देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार? या योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (‘क’ वर्ग मनपा क्षेत्र) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्त्यापोटी ५१ हजार रुपये मिळणार आहेत.

ही कागदपत्रे लागणारया योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवर्गाचा जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, १२वीचे गुणपत्र, बँक खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

१५ जुलैपर्यंत करा अर्जया शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १५ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.

कोठे करायचा अर्ज? छत्रपती संभाजीनगर शहरातील खोकडपुरा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक कार्यालयात ऑफलाइन अर्ज करता येईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र