शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘औकात नसेल तर गाडी कशाला घेतली’ वसुली एजंटाची कर्जदारास शिवीगाळ, पहाटे नेली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 16:56 IST

वसुली एजंटने हप्ते थकल्यामुळे पहाटेच घरातून दुचाकी नेली असून याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

- राम शिनगारेऔरंगाबाद : एका कामगाराने हिरो कंपनीच्या दुचाकीसाठी हिरो फायनान्सकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे पाच हप्ते थकल्यामुळे वसुलीसाठी नेमलेल्या एजंटांच्या माणसांनी कामगाराच्या घरी येऊन बायकोसोबत हुज्जत घालून ‘औकात नसेल तर गाडी कशाला घेतली,’ असे हिणवून शिवीगाळ केली. त्यानंतर गाडी उचलून नेण्यात आली. तेव्हा कामगाराने पैसे भरण्यासाठी कार्यालयाची माहिती विचारताना झालेल्या बाचाबाचीत एजंटाने अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

हेडगेवार हॉस्पिटलजवळील शैलेंद्र मुधिराज यांनी पत्नीच्या नावावर हिरो कंपनीची दुचाकी (एमएच २० एफके १६७६) विकत घेतली. त्यासाठी २० हजार रुपये डाऊनपेमेंट करण्यात आले. उर्वरित रकमेसाठी हिरो फायनान्सकडून कर्ज घेण्यात आले. या कर्जाच्या हप्त्यासाठी २६८७ रुपये प्रतिमहिना द्यावे लागणार होता. कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे मागील पाच महिन्यांपासून हप्ते थकले होते. त्यामुळे वसुली एजंटांनी पैशाची मागणी केली होती. दोन हप्ते भरण्याची तयारी शैलेंद्र यांनी दाखवली होती. मात्र, सर्वच हप्ते भरण्याचा आग्रह एजंटांनी केला. ३ रोजी पहाटे वसुली एजंट योगेश भारसाखळे याच्या तीन माणसांनी दुचाकी उचलून नेली. गाडी घेऊन गेल्यानंतर पावणेसात वाजता जवाहरनगर पोलीस ठाण्यास मेलद्वारे गाडी उचलून नेल्याचे कळविण्यात आले. गाडी गेल्यानंतर तीन दिवसांत मुधिराज यांनी हप्ते भरण्यासाठी पैसे गोळा केले. त्यासाठी त्यांनी कोणत्या कार्यालयात पैसे भरायचे, अशी विचारणा भारसाखळेकडे केली. बोलाचालीचे रूपांतर बाचाबाचीत झाले. भारसाखळे यांनी मुधिराज यांना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीची ऑडिओ रेकॉर्डिंगही मुधिराज यांच्याकडे आहे. त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भारसाखळे विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. याविषयी भारसाखळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत होता.

वाहन नेण्याच्या वेळेचा नियमकोणत्याही गाडीमालकाकडे हप्ते थकलेले असतील तर कामाची वेळ असलेल्या सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान वसुलीसाठी वाहन ताब्यात घेण्याचा नियम आहे. मात्र, हिरो फायनान्सच्या वसुली प्रतिनिधींनी सकाळी ६ वाजताच मुधिराज यांच्या घरी जाऊन गाडी उचलून आणली. त्याचा मेलही सकाळी पावणेसात वाजता पोलिसांना टाकल्याचे उपलब्ध रेकॉर्डवरून स्पष्ट झाले.

शिवीगाळ करू शकत नाही - सोनवणेफायनान्सची बाजू जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आकाश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमचे वसुली एजंट शिवीगाळ करू शकत नाहीत, असा दावा केला. तसेच याविषयी माझ्याऐवजी विभागाचे व्यवस्थापक असलेल्या प्रभाकर कोल्हे यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी दिला. मात्र, त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद