शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाणी हवे तर नळ अधिकृत करून घ्या; अनधिकृत नळांवर कारवाईचे निर्देश

By मुजीब देवणीकर | Updated: May 30, 2024 20:11 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीव्हीपीआर कंपनीमार्फत शहरात जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरात पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरू आहे. प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. अनधिकृत नळांची संख्या १ लाखाहून अधिक आहे. नागरिकांना पाणी हवे असेल तर त्यांनी नळ अधिकृत करून घ्यावेत, अन्यथा अनधिकृत नळांवर कारवाई करावी, असे आदेश मंगळवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.

प्रशासकांनी सकाळी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. आतापर्यंत किती अनधिकृत नळ कनेक्शन कट केले, अशी विचारणा त्यांनी केली. अनधिकृत नळ कनेक्शनसाठी स्वतंत्र पथक तयार केले असून, त्यामार्फत विविध वसाहतींमध्ये कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी बऱ्याच वाढल्या आहेत. जलवाहिनीतील गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जलवाहिनीत कॅमेरे सोडून लिकेज शोधले जाऊ शकतील, अशा एखाद्या खासगी एजन्सीची नियुक्त करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

हर्सूल तलावाच्या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे. तलावातील पाण्याच्या नोंदी दरमहा कराव्यात, जेणेकरून पुढील वर्षी पाण्याचे नियोजन करता येईल. टँकरद्वारे एक लाख नागरिकांची तहान भागविली जात आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर प्रशासकांनी शहर परिसरातील विंधन विहिरी, विहिरींचे जिओ टँगिंग करण्याची सूचना केली. बैठकीला शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता ए. बी. काझी, के. एम. फालक यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह लाइनमनची उपस्थिती होती.

जीव्हीपीआर कंपनीबाबत तक्रारीनवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीव्हीपीआर कंपनीमार्फत शहरात जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे कंपनीकडून केली जात नाहीत, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर कंपनीला अधिकृतपणे पत्र द्या, कंपनीने काम न केल्यास मनपाने करावे, नंतर कंपनीच्या बिलातून ही रक्कम वसूल करावी. जलवाहिन्या टाकताना योग्य प्रमाणात खोलीकरण केले जात नाही, असे प्रकार समोर येत आहेत. निकृष्ट काम केल्यास कंपनीचे बिल दिले जाणार नाही, असा इशाराही प्रशासकांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका