शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे अर्धे ठरले, तर मग वसूल कराचा आमचा वाटा कुठेय? जिल्हा परिषदेचा एमआयडीसीला प्रश्न

By विजय सरवदे | Updated: December 5, 2023 13:43 IST

उद्योगांकडून वसूल होणाऱ्या करापैकी ग्रामपंचायतीच्या वाट्याला ५० टक्के रक्कम देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

छत्रपती संभाजीनगर : वाळुज, शेंद्रा व लगतच्या १४ ग्रामपंचायत क्षेत्रांत जवळपास दोन हजार उद्याेग आहेत. त्यांच्याकडील करवसुलीसाठीएमआयडीसीने फक्त दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींसमोर पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे वसूल करण्यात आलेल्या कराच्या वाटणीचा मुद्दाही गुलदस्त्यात आहे. उद्योगांकडून वसूल होणाऱ्या करापैकी ग्रामपंचायतीच्या वाट्याला ५० टक्के रक्कम देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी उद्योगांकडील मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतनिहाय दोन-दोन कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच एप्रिल २०२३ पर्यंतची थकबाकी आणि मागणीनुसार आतापर्यंतच्या वसुलीबाबतचा अहवाल सादर करण्याचे पत्र एमआयडीसीला दिले आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर या दोन तालुक्यांत १४ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील उद्याेगांची संख्या मोठी आहे. १९ जुलै २०२३ रोजी एमआयडीसीचे उपअभियंते व मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यात झालेल्या बैठकीत उद्योगांकडील करवसुलीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत एमआयडीसीचे दोन-दोन कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत फक्त दोन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एमआयडीसीने एकही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. आता या संदर्भात पंचायत विभागाने आणखी एक स्मरणपत्र एमआयडीसीला दिले आहे.

एमआयडीसी क्षेत्राबाहेर नऊ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची वसुली मात्र, समाधानकारक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आतापर्यंत थकबाकी आणि चालू मागणीपैकी ४५.६१ टक्के वसुली झाली आहे. मार्च २०२३पर्यंत जवळपास सर्वच ग्रामपंचायतींकडे ३ कोटी ८२ लाख ३२ हजार रुपये मालमत्ता कराची थकबाकी, तर चालू मागणी ४३ कोटी ४२ लाख २६ हजार एवढी होती. त्यापैकी ऑक्टोबरअखेर १ कोटी ६९ लाख ५७ हजार रुपये थकबाकी आणि १९ कोटी ८५ लाख २ हजार एवढी चालू मागणीची वसुली झाली आहे.

एमआयडीसी हद्दीतील ग्रामपंचायतीगंगापूर तालुक्यातील वाळूज, घाणेगाव, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वडगाव कोल्हाटी, तिसगाव, पंढरपूर, कुंभेफळ, शेंद्रा कमंगर, शेंद्रा बन, लाडगाव हिवरा, वळदगाव, पाटोदा आणि इटावा अशा १४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत उद्योग आहेत. सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत एमआयडीसीने उद्योगांकडून ६ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये करवसुली केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTaxकरMIDCएमआयडीसी