शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरावेच लागेल, फुकट वीज दिली तर महावितरण बंद पडेल, खाजगी कंपन्या येतील : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 19:20 IST

Nitin Raut : विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल.

औरंगाबाद : वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आणि बँकेचे घेतलेले पैसे भरायचे आहेत. या पुढे वीज कोणालाही फुकट देणार नाही. वीज वापरायची असेल तर बिल भरावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी घेतली. तसेच फुकट वीज दिली तर महावितरण (Mahavitaran ) बंद पडेल, यात खाजगी कंपन्या येतील, असा इशाराही राऊत यांनी आज दिला. 

उर्जामंत्री नितीन राऊतऔरंगाबादमध्ये आयोजित महावितरणाच्या बैठकीसाठी आज शहरात आले होते. दरम्यान, शेतकरी वीज बिलावरून भाजप आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. भाजप आमदारांनी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली सक्तीने करू नये, वीज बिलात सूट द्यावी, अशी मागणी केली. यावर राऊत यांनी वीज बिल भरावेच लागेल, अशी भूमिका घेतली. विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल. वीज कुणालाच फुकट मिळणार नाही. कारण, महावितरण फुकटात वीज विकत घेत नाही. कोणत्याही कंपन्या महावितरणला वीज फुकट देत नाहीत. वीज निर्मिती करण्यास खर्च लागतो. यामुळे बिल भरावेच लागेल असे राऊत यांनी स्पष्ट केले.

वीज निर्मितीसाठी पैसे लागतात वीज निर्मिती करण्यासाठी कंपनांना कोळसा लागतो.त्यांनी बँकांचे कर्ज घेतलेले असते. तर वीज विकत घेण्यासाठी महावितरणला देखील पैसे लागतात. वेळ पडल्यास कर्जही घ्यावे लागते. जर वीज बिल भरले नाही तर महावितरणकडे पैसे नसतील, महावितरण बंद पडेल. यानंतर यात खाजगी कंपन्या येतील, असा इशारा यावेळी उर्जामंत्री राऊत यांनी दिला. 

मोर्चा काढू शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरायला लावणे चुकीचे आहे. ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांनी वीज वापरली नाही, यामुळे शेतकरी चालू बिल भरायला तयार आहेत. दररोज ८ तास देखील वीज मिळत नाही मग कसे भरायचे बिल. शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. जर रोहित्र बंद केले तर याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद